केंद्र सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असते. महिलांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा यासाठी या योजना शासन राबवते. आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत महिलांसाठी उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे.
महिलांना जर उद्योग व्यवसायात भरारी घ्यायची असेल तर भांडवल उभारणीसाठी केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार महिला उद्योग निधी योजना मुद्रा योजना, भारतीय महिला व्यावसाय बँक कर्ज योजना, अन्नपूर्ण योजना, स्त्रीशक्ती पॅकेज आदी योजना आहेत. यापैकी एक उद्योगिनी योजना आहे. ही योजना बँका आणि कर्जपुरवठा करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांच्या माध्यमातून राबविली जाते.
काय आहे उद्योगिनी योजना
महिला सक्षमीकरणासाठी उद्योग, व्यावसाय करणाऱ्या महिलांसाठी ही योजना असून या योजनांतर्गत तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या व इतर योजनांच्या माहितीसाठी अर्जदार महिलेने आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेत भेट द्यावी.
निकष तपासून योजनेतून अर्ज करावा लागतो. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच दिव्यांग महिलांना बिनव्याजी कर्ज, तर इतर महिलांना अल्पदरात कर्ज देण्याची तरतूद आहे.
कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज
बांगडी निर्मिती, ब्युटीपार्लर, बेडशीट, टॉवेल निर्मिती, वही कारखाना, कॉफी, चहा पावडर व्यवसाय, मसाला उद्योग, कापूस धागा उत्पादन, रोपवाटिका, कापड, दुग्ध आदी उद्योगिनी, योजनेंतर्गत कर्जाची तरतूद आहे.
योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर निकष काय?
इच्छुक महिला लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असावे, वयोगट १८ ते ४५ मधील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शासनाकडून कर्जात ३० टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे.