अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-शुक्रवारी सोन्याचा दर १६८ रुपयांनी वाढून ४४,५८० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीचा दर शुक्रवारी १३५ रुपयांनी कमी होऊन ६६,७०६ रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून १,७४१ डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर २६.१२ डॉलर प्रति औंस झाले. गुरुवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव दहा रुपयांनी वाढून ४४,५०९ रुपयांवर पोहोचला.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते सोन्याची मागील बंद किंमत प्रति १० ग्रॅम ४४,४०४ रुपये होती. चांदीदेखील १,०७३ रुपयांनी वाढून ६७,३६४ रुपये प्रति किलो झाली.
आदल्या दिवशी चांदीचा बंद भाव ६६,२९१ रुपये होता. भारतात काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपयापर्यंत वाढले होते. आता ते 45 हजार रुपयांच्या खाली आहेत.
त्यामुळे दागिण्यासाठी सोन्याचे खरेदी वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्था सुधारू लागली असल्यामुळे सोन्याच्या दरात गेल्या वर्षीच्या इतकी वाढ होण्याची शक्यता कमी आहे असे विश्लेषक सांगतात.