स्पेशल

Investment Tips: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला दया उत्तम गिफ्ट! फक्त ‘हे’ काम करा आणि 20 वर्षांनी त्याला 50 लाखाचा मालक बनवा

Published by
Ajay Patil

Investment Tips:- व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात जास्त खर्च लागत असेल तर तो मुलांचे शिक्षणावर आणि त्यांचे लग्नकार्य आणि त्यांच्या उत्तम अशा भविष्याची संबंधित गोष्टींवर. त्यामुळे पालकांना मुलांच्या जन्मानंतर गुंतवणुकीची प्लॅनिंग करणे खूप गरजेचे असते.

आजकालचे शिक्षण पद्धतीमध्ये जर उच्च शिक्षण घ्यायचे तर प्रचंड प्रमाणात महाग झालेले असल्याने लाखो रुपयांचे डोनेशन किंवा शुल्क आपल्याला भरावे लागते व अशावेळी बऱ्याचदा आपल्याकडे पैसा नसतो व अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे मुलाच्या जन्माच्या पासूनच उज्वल भविष्यासाठी पैशांची तरतूद आत्तापासून करून ठेवायला सुरुवात करणे ही काळाची गरज आहे.

ही तरतूद करण्यासाठी साहजिकच तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. समजा तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे व त्याच्या वाढदिवसापासूनच तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली तर त्याच्या वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत तुम्ही लाखो रुपयांचा निधी किंवा फंड जमा करू शकता व मुलांचे शिक्षण तसेच लग्न कार्य व सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी तरतूद करू शकतात.

 प्रत्येक महिन्याला पाच हजाराची गुंतवणूक मुलाचे विसाव्या वर्षापर्यंत त्याला बनवेल पन्नास लाखाचा धनी

यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मधून गुंतवणूक करणे गरजेचे राहिल व ही गुंतवणूक जर तुम्ही दीर्घकालीन केली तर त्याचा चांगला आर्थिक फायदा होतो व तसे आपल्याला सध्या तरी दिसून येते. एसआयपीमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर त्या गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याजाचा फायदा मिळतो व दीर्घकालीन गुंतवणूक केल्यावर त्या माध्यमातून चांगला परतावा मिळतो.

सरासरी म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर 12 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळत आहे. यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की, ही गुंतवणूक जोखीम युक्त असल्याने त्या माध्यमातून एवढा परतावा मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे अधिकृत आर्थिक तज्ञाची किंवा सल्लागाराची मदत घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

समजा यामध्ये तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे व त्या दिवसापासून तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजारांची एसआयपी सुरू केली व ती वीस वर्षांपर्यंत सतत सुरू ठेवली तर तुमची वीस वर्षात एकूण गुंतवणूक 12 लाख रुपये होते. 12% परताव्याने या एकूण रकमेवर तुम्हाला 37 लाख 95 हजार 740 रुपयांचे व्याज मिळते.

यामध्ये जमा झालेली मुद्दल बारा लाख व व्याज 37 लाख 95 हजार 740 एकत्र केले तर तुमचा पन्नास लाखांचा निधी तयार होतो. याप्रकारे तुम्ही तुमच्या मुलाच्या 20 व्या वर्षी त्याला 50 लाख रुपयांचा मालक बनवू शकतात.

याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलाच्या 18 वर्षाच्या वयापर्यंत प्रत्येक महिन्याला पाच हजारांची गुंतवणूक सुरू ठेवल्यास अठरा वर्षांनी तुम्हाला त्या रकमेवर 12% नुसार 35 लाख 58 हजार 643 रुपये व्याज मिळते आणि अठरा वर्षातील एकूण गुंतवणूक 10 लाख 80 हजार रुपये जमा होते व दोघे मिळून 18 वर्षापर्यंत मुलाच्या नावाने 45 लाख रुपयांचा फंड जमा होतो.

Ajay Patil