स्पेशल

iPhone 12 खरेदी करता येणार फक्त 12 हजारात, अमेझॉन की फ्लिपकार्ट कुठे सुरू आहे ऑफर ? वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

iPhone 12 Discount Offer : तुमचेही आयफोन खरेदीचे स्वप्न आहे का ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे.

आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयफोन 12 च्या खरेदीवर मोठा बंपर डिस्काउंट ऑफर दिला जात आहे.

खरंतर आयफोन 15 लॉन्च झाल्यानंतर कंपनीने आपल्या इतर सर्व मॉडेलच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये आयफोन 12 च्या किमती देखील कमी केल्या गेल्या आहेत.

विशेष म्हणजे फ्लिपकार्ट या प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आयफोन 12 या लोकप्रिय मॉडेलवर अतिरिक्त सूट देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टवर सध्या आयफोन 12 मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे जर तुम्हाला आयफोन 12 खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच राहणार आहे.

किती डिस्काउंट मिळतोय

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्ट या लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आयफोन 12 चे 64 जीबी व्हेरिएंट 49 हजार 900 रुपये यांना लिस्ट करण्यात आले आहे.

मात्र सध्या या व्हेरियंटवर नऊ टक्के एवढी घसघशीत सूट दिली जात आहे. म्हणजेच या डिस्काउंट ऑफर नंतर हा आयफोन ग्राहकांना 44,999 उपलब्ध होणार आहे.

म्हणजे जवळपास 5 हजार रुपयांची सूट यावर उपलब्ध होणार आहे. एवढेच नाही तर यावर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळणार आहे.

एक्सचेंज ऑफर अंतर्गत 33 हजार 750 रुपयांचा बेनिफिट मिळवता येणार आहे. जर तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाला तर 5,000 रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट आणि या एक्सचेंज ऑफरचा मिळालेला बेनिफिट पकडून तुम्हाला आयफोन 12 फक्त आणि फक्त 11,249 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

मात्र तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाला तेव्हाच 11,249 रुपयांना हा आयफोन मिळू शकतो अन्यथा तुम्हाला फक्त फ्लॅट डिस्काउंटचाच लाभ मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office