Categories: स्पेशल

इरफान खानचा ‘तो’ शेवटचा संदेश पुन्हा एकदा समोर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांनी बुधवारी जगाला निरोप दिला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत.

अशातच इरफान खानचा शेवटचा संदेश समोर आला आहे. रुपेरी पडद्यावर कमबॅकबद्दल इरफानने एक संदेश दिला होता. या वर्षाच्या सुरुवातीला इरफानचा इंग्लिश मिडीयम हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे जाहीर केले होते.

वर्षभरापासून पडद्यावरून गायब असल्याने त्याचे फॅन्स त्याची आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत त्याने आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्हॉईस मेसेज दिला.

इरफानचा शेवटचा संदेश इरफान खानचा संदेश पुन्हा एकदा समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये इरफान म्हणत आहे- नमस्कार मी इरफान. मी आज तुमाच्या बरोबर आहेही आणि नाहीही.

असो, इंग्लिश मीडियम हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्यावर विश्वास ठेवा माझी मनापासून इच्छा होती की खूप मनापासून ह्या चित्रपटाचे प्रमोशन करावे जितक्या तन्मयतेने हा चित्रपट बनविला आहे.

पण माझ्या शरीरात अतिथी बसले आहेत, त्यांच्याशी बातचीत चालू आहे. पाहूया नशीब कसे साथ देत आहे. तसे झाल्यास आपणास कळविले जाईल.

इरफान पुढे म्हणतो – जेव्हा नशीब आपल्या हातात लिंबू देते, तेव्हा आपण त्याचे सरबत बनविले पाहिजे. परंतु हे बोलण्यापुरते ठीक वाटते. पण तुम्ही पॉजिटीव्ह राहायचे सोडून इतर काही करू शकत नाही.

खूप तन्मयतेने हा चित्रपट बनविला आहे. मला आशा आहे की हा चित्रपट आपल्याला हसणे , हसणे, रडणे, शिकवेल. ट्रेलरचा आनंद घ्या आणि एकमेकांवर प्रेम करा आणि चित्रपट पहा. आणि हो, माझी वाट पहा.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24