स्पेशल

मालमत्ता खरेदीमध्ये फुल पेमेंट एग्रीमेंट आहे का फायद्याचे? मालमत्तेची रजिस्ट्री करावी की फुल पेमेंट एग्रीमेंट? जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Full Payment Agreement:- कुठलीही मालमत्ता खरेदी करताना आपल्याला अनेक प्रकारच्या नियमांच्या अधीन राहून आणि सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून मालमत्तेच्या संदर्भातील व्यवहार पूर्ण करणे खूप गरजेचे असते. कारण मालमत्ता व्यवहारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत असतो.

अशाप्रसंगी एखादी छोटीशी चूक देखील तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून नुकसानदायक ठरू शकते आणि मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागू शकते.

त्यामुळे तुम्ही कुठल्याही मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर मात्र खूप सावधानतेने करणे गरजेचे असते.मालमत्ता व्यवहार करताना जेव्हा आपण ती खरेदी करतो त्यामध्ये अनेक कायदेशीर प्रक्रिया असतात व प्रत्येक प्रक्रिया अचुकतेने पार पाडणे गरजेचे असते.

साधारणपणे कोणत्याही मालमत्तेची खरेदी करण्यासाठी त्या मालमत्तेची नोंदणी अर्थात रजिस्ट्री ऑफ प्रॉपर्टी करणे खूप गरजेचे असते. जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करता आणि खरेदी केल्यानंतर तिची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री ऑफ प्रॉपर्टी करतात तेव्हाच तुम्ही त्या मालमत्तेचे मालक बनतात.

परंतु आपल्याकडे मालमत्तेची खरेदी विक्री फुल पेमेंट ॲग्रीमेंटच्या माध्यमातून देखील केली जाते. परंतु हा कुठलीही मालमत्ता खरेदी करण्यासाठीचा फायद्याचा मार्ग किंवा पर्याय आहे का? हे देखील पाहणे तितकेच गरजेचे असते.

 मालमत्ता खरेदीमध्ये फुल पेमेंट एग्रीमेंट करावे का?

एखादी प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर प्रॉपर्टीचे प्रॉपर्टी ऑफ रजिस्ट्री म्हणजेच नोंदणी करणे गरजेचे असते व अशी नोंदणी किंवा दाखल खारीज केल्यानंतरच तुम्ही त्या मालमत्तेचे मालक बनत असतात.

परंतु त्या व्यतिरिक्त भारतामध्ये मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारात फुल पेमेंट एग्रीमेंट म्हणजेच पूर्ण पेमेंट करार देखील केला जातो. परंतु हा एक प्रॉपर्टी खरेदीमध्ये फायद्याचा मार्ग नाही.

तुम्ही जर फुल पेमेंट ॲग्रीमेंटच्या माध्यमातून एखादी मालमत्ता खरेदी करत असाल तर हा निर्णय चुकीचा ठरू शकतो.कारण फुल पेमेंट एग्रीमेंटच्या माध्यमातून तुम्ही पैसा देऊन मालमत्ता खरेदी केली तरी देखील तुम्ही मालमत्तेचे मालक होऊ शकत नाहीत व भविष्यामध्ये तुम्हाला मालमत्ता गमवावी लागू शकते.

त्यामुळे तुम्हाला जर एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्या प्रॉपर्टीची नोंदणी करता येईल अशी प्रॉपर्टी खरेदी करावी. फुल पेमेंट एग्रीमेंटमध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये बचत करता येते. बचतीच्या दृष्टिकोनातून फुल पेमेंट एग्रीमेंट फायद्याचे असते.

  पावर ऑफ ॲटर्नी किंवा फुल पेमेंट एग्रीमेंटने मालमत्तेचा मालकी हक्क मिळत नाही

फुल पेमेंट आग्रीमेंट किंवा पावर ऑफ ॲटर्नी  केल्यामुळे तुम्ही मालमत्तेचे कायदेशीर मालक होत नाहीत. फुल पेमेंट एग्रीमेंट मालकीचा दस्तवेज नसल्यामुळे मालमत्तेचे कोणतेही म्युटेशन यामुळे होत नाही.

अशा प्रकारची प्रकरणे जर कोर्टात जरी गेली तरी ते कमकुवत असतात. कारण मालमत्तेच्या नोंदणी शिवाय तुम्ही कोर्टात देखील संबंधित मालमत्तेवर तुमचा मालकी हक्क सिद्ध करू शकत नाही व तुम्ही कष्टाने पैसे देऊन घेतलेली मालमत्ता तुमच्या हातातून जाण्याचा धोका असतो.

 फुल पेमेंट एग्रीमेंटच्या माध्यमातून खरेदीदाराचा दावा मजबूत कसा होतो?

समजा तुम्हाला फुल पेमेंट एग्रीमेंटच करायचे आहे तर तुम्ही विहित स्टॅम्प पेपरवर एग्रीमेंट करू शकतात. तसेच त्यावर खरेदीदार व विक्रेता या दोघांच्या सह्या तसेच साक्षीदारांच्या सह्या असणे गरजेचे आहे.

इतकेच नाहीतर तुम्ही दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे पेमेंट करत असाल तर ते रोखीने न करता चेक किंवा बँक ट्रान्सफर द्वारे करावे. अशाप्रकारे जर तुम्ही फुल पेमेंट पेमेंट केले तर तुमचा दावा अधिक मजबूत होतो आणि विक्रेत्याला न्यायालयाद्वारे नोंदणी करण्यास भाग पाडले जाऊ शकते.

Ajay Patil