तुमचे गणित चांगले आहे ? मग तुम्हाला दीड लाख रुपये मिळवण्याची संधी ; वाचा सविस्तर …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- जर तुम्ही मॅथ सब्जेक्टमध्ये चांगले असाल तर तुमच्याकडे दीड लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी आहे. अखिल भारतीय तंत्र कौशल्य विकास परिषद (एआयसीटीएसडी) 10 जून रोजी ‘आर्यभट्ट राष्ट्रीय गणित स्पर्धा 2021’ आयोजित करेल.

aictsd.com वर जाहीर झालेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 मे आहे. तसेच परीक्षेचा अंतिम निकाल 30 जून रोजी जाहीर केला जाईल. या स्पर्धेत 30 प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्याना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल. चला या स्पर्धेचे उर्वरित तपशील जाणून घेऊया.

अर्ज कसा करावा ? :- अधिकृत वेबसाइटवर जा aictsd.com. आपला तपशील प्रविष्ट करा आणि ऑनलाईन अर्ज भरा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने 290 रुपये अर्ज प्रक्रिया शुल्क भरा.

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर व फी भरण्याच्या प्रक्रियेनंतर हॉल तिकिट क्रमांकासह 48 तासांच्या आत रजिस्ट्रेशन कंफर्मेशन रजिस्टर्ड ईमेल आईडीवर पाठविला जाईल.

किती बक्षीस मिळेल ? :- पहिले पारितोषिक दीड लाख रुपये तर दुसरे पारितोषिक 50000 रुपये आहे. याशिवाय आणखी एक तृतीय पारितोषिक देखील आहे. तृतीय पुरस्कार अंतर्गत 10,000 रुपये बक्षीस म्हणून देण्यात येतील.

10 ते 24 वर्षे वयोगटातील कोणतेही महाविद्यालय किंवा शालेय विद्यार्थी या स्पर्धेत अर्ज करू शकतात. स्पर्धेत भाग घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला एआयसीएसडी आणि आयआयटी बॉम्बे एल्यूमिनाई कडून प्रमाणपत्र मिळेल.

रोख बक्षिसाशिवाय आणखी काय मिळेल? :- विजेत्यांना वर उल्लेखलेल्या रोख बक्षिसाशिवाय आणखीही अनेक सुविधा मिळतील. त्यापैकी प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास दीड लाख रुपायांव्यतिरिक्त नॅशनल मॅथ सायंटिस्ट ट्रॉफी, रोबोटिक्स ऑटोमेशन अँड सॉफ्टवेअरवर एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याची फी 1 लाख रुपये असते. तसेच, विजेत्यास राष्ट्रीय गणित विज्ञान शिष्यवृत्ती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत सामील होण्याची संधी मिळेल. दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाच्या विजेत्यासही या संधी मिळतील.

परीक्षा कशी असेल हे जाणून घ्या :- परीक्षेच्या स्वरुपात गणित स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येईल आणि अर्जदारांना घरून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात येईल. प्रश्नपत्रिकेत 30 मल्टीऑप्शनल प्रश्न असतील. स्पर्धेचा एकूण कालावधी 45 मिनिटे आहे. यापैकी प्रथम 20 टॉप विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

पुढील प्रक्रिया जाणून घ्या :- ऑनलाईन लाइव्ह मुलाखत फेरीसाठी प्रथम 20 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल आणि 20 विद्यार्थ्यांपैकी अव्वल तीन उमेदवार विजयी घोषित केले जातील.

ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीसाठी लिंक नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठविले जातील. आपण कोणतीही अतिरिक्त माहिती घेऊ इच्छित असल्यास, नंतर director@aictsd.com वर ईमेल पाठविण्याचा ऑप्शन आहे. आपण ईमेल पाठवून आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24