ITC Hotels Share Price : एफएमसीजी सेक्टर मधील दिग्गज कंपनी आयटीसी लिमिटेडपासून विभक्त झालेला हॉटेल व्यवसाय आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स बुधवारी, 29 जानेवारी रोजी 2025 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाले. आयटीसी हॉटेल्स सिगरेट-से-एफएमसीजी ग्रुप आयटीसी लिमिटेडचे एक स्वतंत्र युनिट आहे.
आयटीसी हॉटेल व्यवसायाचे डी मर्जर 1 जानेवारी रोजी अंमलात आले, जेणेकरून आयटीसी हॉटेल स्वतंत्रपणे सूचीबद्ध केले जाईल म्हणूनचं हे पाऊल उचलण्यात आले होते. आयटीसी हॉटेल्सची किंमत एनएसई वर प्रति शेअर ₹ 260 होती आणि बीएसईवरील प्रति शेअर 270 होती.
कंपनीचे शेअर्स 30% सूटवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मूळ कंपनी आयटीसी लिमिटेडपासून विभक्त झाल्यानंतर बुधवारी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स सूचीबद्ध झालेत.
आयटीसी हॉटेल्सचे स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर डिस्कव्हर प्राईस 270 रुपयांऐवजी 30.37% डिस्काउंटसह ₹188 वर सूचीबद्ध झालेत. त्याच वेळी, आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स एनएसई वर प्रति शेअर ₹ 180 वर सूचीबद्ध केले गेले होते, जे डिस्कवर प्राईस प्रति शेअर 260 डॉलरच्या तुलनेत 30.77% पेक्षा कमी आहेत.
म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर यावर 30.77% डिस्काउंट देण्यात आले आहे. लिस्टिंग झाल्याबरोबर या स्टॉकला पाच टक्के लोअर सर्किट लागले आणि बीएसईवर हा स्टॉक 178.60 रुपये इंट्रा डे पर्यंत खाली आलाय.
म्हणजेच या शेअरची बाजारातील सुरुवात ही निराशा जनक राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदारांचे या स्टॉक कडे लक्ष राहणार आहे. पुढे हा स्टॉक नेमकी काय कामगिरी करणार, गुंतवणूकदारांचा यावर विश्वास राहणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
मंडळी आयटीसी हॉटेल्सचा डीमर्जर रेशो 1:10 होता, याचा अर्थ असा आहे की विद्यमान आयटीसी भागधारकांना प्रत्येक 10 आयटीसी शेअर्ससाठी 1 आयटीसी हॉटेल शेअर प्राप्त झाला. पॅरेंट कंपनी आयटीसी लिमिटेडने नवीन युनिटमध्ये 40.0% हिस्सा कायम ठेवला अन उर्वरित 60.0% भागधारकांमध्ये वितरण केले गेले.
मंडळी आम्ही आपणास सांगू इच्छितो की नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या कोलकाता पीठाने 16 डिसेंबर 2024 रोजी या व्यवसाय विभाजन योजनेस मान्यता दिली होते. आयटीसी हॉटेल्स 90 ठिकाणी 140 हून अधिक हॉटेल चालविते आणि त्यात सहा भिन्न ब्रँड सुद्धा आहेत.