स्पेशल

‘त्या’ निर्णयामुळे जडेजा आणि कर्णधार विराट कोहली संतापले !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- अबुधाबीमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केला.

न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये केलेल्या चुकांमधून धडा घेत विराट ब्रिगेडने या सामन्यात तिन्ही विभागात चमकदार कामगिरी केली.

या सामन्यातही भारतीय टीमचे हिरो रोहित शर्मा (74) आणि केएल राहुल (69) होतं. ज्यांनी पहिल्या विकेटसाठी 140 धावांची पार्टरनरशीप केली. पण रवींद्र जडेजाने त्याच्या फिल्डींग सर्वांची मने जिंकली.

कालच्या सामन्यात जडेजाने शमीच्या चेंडूवर अशक्यप्राय झेल पकडला होता, पण थर्ड अंपायरने फलंदाजाला benefit of doubt दिला. ही संपूर्ण घटना अफगाणिस्तानच्या डावाच्या 19व्या ओव्हरमध्ये घडली.

त्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या दुसऱ्या बॉलवर करीम जन्नतने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी रवींद्र जडेजाने हवेत शानदार डाइव्ह करताना कॅच घेतला.

जडेजाला या कॅचबद्दल पूर्ण विश्वास होता आणि टीमच्या इतर खेळाडूंनी देखील प्रयत्नांचं कौतुक केलं. मैदानावरील अंपायरला या झेलबद्दल पूर्ण खात्री नव्हती.

त्यामुळे हा निर्णय थर्ड अंपायरकडे देण्यात आला. थर्ड अंपायरला हा निर्णय देण्यास बराच वेळ लागला. अखेर थर्ड अंपायरने फलंदाजाच्या बाजूने निकाल दिला.

थर्ड अंपायरच्या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या निर्णयामुळे जडेजा आणि कर्णधार विराट कोहली चांगलेच संतापलेले दिसले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office