Jamin Bakshis Patra : आपण सर्वजण आपल्या पुढील पिढीचे भविष्य आर्थिक दृष्ट्या चांगले व्हावे यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. जमीन जुमला घर फ्लॅट प्लॉट विकत घेतो. मात्र याच संपत्तीवरून कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद विवाद देखील होतात. अनेक वादविवाद भांडणांमध्ये परावर्तित होतात आणि काही प्रकरणांमध्ये छोटी मोठी भांडणे हाणामारी पर्यंत जातात.
दरम्यान हाच विवाद होऊ नये यासाठी काही लोक बक्षीस पत्र करतात आणि आपली संपत्ती बक्षीस म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीला देत असतात. शेतजमीन घर फ्लॅट इत्यादी मालमत्ता आपल्या जवळच्या व्यक्तीला देण्यासाठी बक्षीस पत्र केले जाते.
बक्षीस पत्र हे एक अधिकृत शासकीय दस्तऐवज आहे. या कागदपत्रामुळे रक्ताच्या नात्यात मालमत्तेचे व्यवहार करताना भविष्यातील वाद टाळण्यासं मदत होते. बक्षीसपत्राची कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी एक ठराविक मुद्रांक शुल्क देखील भरावे लागते.
मालमत्तेची किंमत आणि स्थानानुसार मुद्रांक शुल्काची ही रक्कम बदलत असते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बक्षीस पत्राची नोंदणी नेमके कुठे होते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की बक्षीस पत्राची नोंदणी ही स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात करणे आवश्यक असते.
जेव्हा मुद्रांक शुल्क भरतात तेव्हा भेट पत्राची नोंदणी स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात करणे आवश्यक आहे. नोंदणी या दस्तऐवजाला कायदेशीर वैधता प्रदान करते. यामुळे बक्षीस पत्राचे नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात करणे महत्वाचे ठरते.
आई-वडील मुलांना देत असलेल्या बक्षीसपत्राच्या दस्तात भविष्यात ही मिळकत त्यांच्या संमतीशिवाय मुलांनी विकू नये, असे सुद्धा नमूद केले जाते.
दरम्यान हे बक्षीस पत्र बनवताना बक्षीस पत्र ज्याच्या नावे बनवले जात आहे म्हणजेच घेणारा आणि जो बक्षीस पत्र बनवत आहे म्हणजे देणारा ते दोन्हीही संबंधित कार्यालयात म्हणजेच दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहणे आवश्यक असते. अर्थातच परस्पर बक्षीस पत्र बनवले जाऊ शकत नाही.
बक्षीस पत्र बनवताना संबंधित कार्यालयात दोन्ही व्यक्ती हजर असणे आवश्यक असते. हे बक्षीसपत्र कायदेशीररीत्या ग्राह्य धरले जात असल्याने बक्षीसपत्र करताना चांगल्या वर्तणुकीच्या दोन साक्षीदारांच्या सह्या सुद्धा लागतात.