जानेवारी महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद राहणार ! RBI ची मोठी माहिती

नवीन वर्ष सुरू झालंय पण नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे, कारण या महिन्यात बँकांना एकूण 15 दिवस सुट्ट्या असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या सुट्टीच्या या कॅलेंडरमध्ये सण, राष्ट्रीय सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश होतो. यामुळे जर तुम्हालाही जानेवारी महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करायचे असतील तर या सुट्ट्यांचे वेळापत्रक तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Tejas B Shelar
Published:
January Bank Holiday

January Bank Holiday : नववर्षाची नुकतीच सुरुवात झाली आहे. नववर्षाच्या सुरवातीलाचं मात्र बँक ग्राहकांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. जानेवारी महिन्यात देशातील बँका किती दिवसांसाठी बंद राहणार याची माहिती आरबीआयकडून नुकतीचं जारी करण्यात आली आहे.

आरबीआयच्या संकेतस्थळावर जानेवारी 2025 मधील सुट्ट्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली असून आज आपण जानेवारी महिन्यात देशातील बँका किती दिवसांसाठी बंद राहणार याबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नवीन वर्ष सुरू झालंय पण नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँकिंग सेवेवर परिणाम होणार आहे, कारण या महिन्यात बँकांना एकूण 15 दिवस सुट्ट्या असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या सुट्टीच्या या कॅलेंडरमध्ये सण, राष्ट्रीय सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश होतो.

यामुळे जर तुम्हालाही जानेवारी महिन्यात काही महत्त्वाची कामे पूर्ण करायचे असतील तर या सुट्ट्यांचे वेळापत्रक तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. दरम्यान ज्या दिवशी बँकांना सुट्टी असेल त्या दिवशी ग्राहक ऑनलाईन व्यवहार करू शकतात.

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल.

क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल. मात्र, जी कामे फक्त बँकेत जाऊनच करायची असतील ती कामे तुम्हाला खाली दिलेल्या सुट्ट्या विचारात घेऊनच करावी लागणार आहेत.

१ जानेवारी : नवीन वर्ष/ लोसांग नामसूंग- काही राज्यांमध्ये बँका बंद
२ जानेवारी : मन्नम जयंती
५ जानेवारी : रविवार
६ जानेवारी : गुरू गोविंद सिंग जयंती- चंदिगड, हरियाणा
११ जानेवारी : दुसरा शनिवार
१२ जानेवारी : रविवार- स्वामी विवेकानंद जयंती
१४ जानेवारी : मकर संक्रांती- पोंगल- अहमदाबाद, बंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, गंगाटोक, गुवाहाटी, हैद्राबाद, तेलंगणा, कानपूर, लखनऊ
१५ जानेवारी : तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू – मकर संक्रांती – चेन्नई
१६ जानेवारी : उज्जावर तिरुनल – चेन्नई
१९ जानेवारी : रविवार
२२ जानेवारी : इमॉइन
२३ जानेवारी : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती- आगरतळा, भुवनेश्वर, कोलकत्ता
२५ जानेवारी : चौथा शनिवार
२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन – सर्वत्र
३० जानेवारी : शहीद दिन

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe