जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, 895 रुपयात मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडीटी, नेट बॅलन्स किती ?

Ahmednagarlive24 office
Published:

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओने गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. या कंपनीचे करोडो ग्राहक आहेत. दरम्यान या कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये चांगला नफाही कमावला आहे. विशेष म्हणजे जिओने आपल्या ग्राहकांना अनेक सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत.

जिओ ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन ऑफर करते. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार प्लॅन सिलेक्ट करता येतात. कंपनीने अनेक स्वस्त प्लॅन्स देखील लाँच केले आहेत. दरम्यान आज आपण कंपनीच्या अशाच एका लोकप्रिय आणि स्वस्त प्लानची माहिती पाहणार आहोत.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना जवळपास 11 महिन्यांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. तसेच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि नेट बॅलन्स देखील उपलब्ध होणार आहे. तसेच इतरही अनेक लाभ या प्लॅन सोबत ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात आहेत.

कोणता आहे तो प्लान :- रिलायन्स जिओ ने 895 रुपयाचा एक प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना लॉन्ग टर्म व्हॅलिडीटी मिळते. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना 11 महिन्यांची म्हणजेच 336 दिवसांची व्हॅलिडीटी उपलब्ध आहे. म्हणजेच जर 28 दिवसांचा एक महिना पकडला तर हा प्लॅन बारा महिन्यांचा होतो.

खरे तर जिओ सहित अनेक कंपन्या मंथली प्लॅन 28 दिवसांचाच बनवतात. दरम्यान या 336 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या प्लॅनमध्ये 24 जीबी एवढा डेटा ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो. परंतु हा डेटा 28 दिवसाच्या कालावधीसाठी दोन जीबी याप्रमाणे उपलब्ध होणार आहे.

म्हणजेच प्लॅनची व्हॅलिडीटी जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रत्येक 28 दिवसांसाठी दोन जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध होते. एवढेच नाही तर प्रत्येक 28 दिवसांसाठी 50 SMS देखील मिळतात.

या प्लॅन सोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड यांचे ॲक्सेस देखील मिळते. तसेच डेटा लिमिट संपल्यानंतर 64 केबीपीएसने नेट सुद्धा वापरता येते. जिओचा हा प्लॅन मात्र फक्त आणि फक्त जिओ फोन युजर्ससाठी आहे. म्हणजेच सर्वच ग्राहकांना या प्लॅनचा लाभ मिळणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe