अनेक शासकीय कागदपत्रांमध्ये महत्त्वाची कागदपत्र पाहिली तर आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र ही प्रामुख्याने महत्त्वाची कागदपत्र आहे. यातील जर आपण मतदार ओळखपत्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर निवडणुकीमध्ये मतदान करण्याकरिता ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र दाखवावे लागते.
कारण हे सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले एक महत्त्वाचे कागदपत्र असून ओळखीचा पुरावा म्हणून आपल्याला ते वापरता येते. परंतु मतदार ओळखपत्राच्या बाबतीत जर आपण बघितले तर अनेक विवाहित महिलांना लग्न झाल्यानंतर मात्र त्यांच्या लग्नानंतर मतदान ओळखपत्र त्यांच्या असलेल्या नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करणे गरजेचे असते.
त्यामुळे बऱ्याचदा आपला गोंधळ उडतो. परंतु यामध्ये गोंधळ उडू न देता अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला मुलींच्या लग्नानंतर त्यांचे मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर ट्रान्सफर करता येते. याकरिता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक सोपी अशी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे
व या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून मतदार ओळखपत्र ट्रान्सफर करणे अतिशय सोपे झालेले आहे. विशेष म्हणजे हे ओळखपत्र तुम्ही अगदी घरी बसून ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून ट्रान्सफर करू शकता. या लेखात आपण नवीन पत्त्यावर मतदान ओळखपत्र ट्रान्सफर कसे करायचे याबद्दलची माहिती जाणून घेऊ.
या सात स्टेप वापरा आणि अर्ज करा
1- यातील पहिली स्टेप पाहिली तर सगळ्यात अगोदर तुम्हाला याकरिता राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या वेबसाईटवर जावे लागेल.
2- त्यानंतर दुसऱ्या पायरीत शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स हा पर्याय तुम्हाला होम पेजवर दिसतो व यामध्ये तुम्हाला फॉर्म आठ वर टॅप करून तो फॉर्म भरावा लागेल.
3- तिसऱ्या पायरीमध्ये सेल्फ वर क्लिक करावे आणि त्या ठिकाणी EPIC क्रमांक नमूद करून सबमिट करावे.
4- चौथ्या पायरीमध्ये तुम्हाला मतदार तपशील नीट तपासावे लागेल आणि नंतर शिफ्टिंग
ऑफ रेसिडेन्स वर क्लिक करावे लागेल.5- पाचव्या पायरीमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे तपशील फॉर्म आठमध्ये भरावे लागतील.उदाहरण घ्यायचे झाले तर यामध्ये तुम्हाला राज्य तसेच जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि नवीन पत्ता, नवीन पत्त्याच्या पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्र इत्यादी माहिती भरावी लागेल व नंतर कॅपच्या कोड टाकून सबमिट करावे लागेल.
6- सहाव्या पायरीमध्ये तुम्हाला फॉर्म 8 भरून झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेलवर एप्लीकेशन रेफरन्स नंबर येतो.
7- त्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल अर्थात एनव्हीएसपी पोर्टल वरून डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करू शकतात.
लग्नानंतर ऑनलाईन मतदार ओळखपत्र ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
1- यामध्ये तुम्हाला युटिलिटी बिल म्हणजेच पाणी, गॅस आणि विजेचे बिल लागेल व ते मागील एक वर्षाच्या आत दिलेले असावे.
2- तसेच आधार कार्डची आवश्यकता भासेल.
3- राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल बँक किंवा पोस्ट ऑफिस मधून चालू पासबुक
4- भारतीय पासपोर्ट
5- शेतकरी खातेवही सह महसूल विभागाच्या जमिनीच्या मालकीच्या नोंदी
6- नोंदणीकृत भाडेकरार
7- नोंदणीकृत विक्री करार
इत्यादी कागदपत्रे यासाठी लागू शकतात.