स्पेशल

किशोर काकडेना मिळेल आल्याचे भरघोस उत्पादन! शेतीची ‘ही’ पद्धत आली कामी; कमी खर्चात एकरी मिळेल 100 क्विंटल उत्पादन

Published by
Ajay Patil

Ginger Farming:- आपल्याला जर एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल व ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूपच विपरीत परिस्थिती असेल तर मात्र ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यामध्ये न हरता प्रयत्न करावे लागतात व वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब करून आपल्याला मार्ग काढावा लागतो.

हीच बाब शेतीच्या बाबतीत देखील आपल्याला लागू होताना दिसते. कुठल्याही पिकापासून जर आपल्याला भरघोस असे उत्पादन मिळवायचे असेल तर त्याकरिता जमीन योग्य असणं खूप गरजेचे असते. जमीन जर योग्य स्वरूपाची नसेल तर तुम्ही कितीही व्यवस्थापन केले तरी पिकांपासून भरघोस उत्पादन मिळत नाही.

परंतु आता शेतकरी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून नापिक जमिनींमध्ये देखील अनेक प्रकारच्या पिकांचे भरघोस उत्पादन घेताना आपल्याला दिसून येत आहेत व यामागे त्यांचे प्रचंड प्रमाणात कष्ट असतात.

याच मुद्द्याला धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाघलगावचे प्रगतिशील शेतकरी किशोर नाना काकडे यांची यशोगाथा पाहिली तर ती नक्कीच इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे.

गेल्या सहा वर्षापासून किशोर काकडे हे एक एकर शेतीमध्ये आले लागवड करत असून जैविक निविष्ठांचा वापर करत असल्याने एकरी लाखो रुपयांचा येणारा खर्च त्यांनी केवळ दहा हजार रुपयांवर आणला आहे.

 पाणी साचणाऱ्या जमिनीत घेतात आल्याचे विक्रमी उत्पादन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या वाघलगाव येथील प्रयोगशील शेतकरी किशोर नाना काकडे गेल्या सहा वर्षापासून एक एकर शेतीमध्ये आले लागवड करतात.

परंतु त्यांच्या या आली शेतीचे वैशिष्ट्य बघितले तर ते रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशकांना ऐवजी जैविक निविष्ठांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत केवळ काही हजार रुपये खर्च करून आल्याचे विक्रमी उत्पादन घेतात.

दुसरे महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची जी काही शेती आहे ती इतर शेत जमिनीच्या तुलनेमध्ये साधारणपणे दीड फूट खाली आहे. यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते व पिकावर खर्च करून देखील चांगले उत्पन्न मिळवणे खूप अवघड होत होते.

यावर उपाय म्हणून त्यांनी जैविक निविष्ठांचा वापर करायचे ठरवले व या निविष्ठांचा वापर केल्यामुळे शेतातून पाण्याचा पटकन निचरा होण्यास मदत होते व ही गोष्ट त्यांना समजल्यामुळे त्या शेतामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर जैविक निविष्ठांचा वापर करायला सुरुवात केली व आले पिकाचे उत्पादन घेतले.

यावर्षी देखील त्यांनी आल्याची लागवड केली असून यावर्षी त्यांचे पीक उत्तम असे बहरले आहे. विशेष म्हणजे जैविक निविष्ठांचा वापर केल्यामुळे यावर्षी वारंवार शेतातून पाणी गेले तरी देखील पीक दमदार असल्याचे त्यांनी सांगितले.

 अशाप्रकारे केले आहे आले लागवडीचे नियोजन

किशोर काकडे यांनी आले लागवडीसाठी आठ जूनला चार फुटांची बेड सरी टाकून टोकन पद्धतीने आल्याची लागवड केली होती. या पिकाला पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता यावे याकरिता 20 एमएम ठिबकची व्यवस्था करून उत्तम प्रकारे पाणी व्यवस्थापन केले.

महाबीजचे केएमबी, पीएसबी तसेच ट्रायकोडर्मा इत्यादी जैविक निविष्ठांचा लागवडीनंतर 15 ते 35 दिवसांच्या कालावधीत त्यांनी वापर करून योग्य व्यवस्थापन केले. त्यामुळे शेतातून पाणी जाऊन देखील कुठल्याही प्रकारची सड पिकावर आली नाही व आले पिकाला अधिक फुटवे तसेच सफेद मुळ्यांची जास्त वाढ झाल्याचे दिसून आले व अधिक काळ हिरवेपणा देखील टिकला.

अशाप्रकारे दर्जेदार असे आले पीक शेतात उभे राहिल्यामुळे त्यापासून एकरी शंभर क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

आले पिकात जास्त कालावधी करिता हिरवेपणा हा जैविक निविष्ठांचा वापर केल्यामुळे दिसून आला व यामुळे त्यांच्या शेतामध्ये दमदार असे आल्याचे पीक बहरले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या त्यांच्या आले एक चर्चेचा विषय ठरला आहे.

अशाप्रकारे किशोर काकडे इतर शेतकऱ्यांना सल्ला देताना म्हणतात की, शेतकऱ्यांनी जेवढ्या अधिक प्रमाणात शक्य आहे तितक्या प्रमाणामध्ये जैविक शेती करण्यावर भर द्यावा. खते तसेच औषधी यांचा होणारा खर्च जर बघितला

व त्या दृष्टिकोनातून हातात मिळणारे उत्पादन जर बघितले तर हातात काहीच शिल्लक राहत नाही. म्हणून जैविक निविष्ठांचा वापर करून शेतकऱ्यांनी पिकांमधून अधिकाधिक उत्पादन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

Ajay Patil