अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट खाल्लेच असेल. सीबीआयने हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनी कॅडबरीविरूद्ध 240 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कॅडबरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही 2010 पासून संपूर्णपणे अमेरिकन स्नॅक्स कंपनी मॉन्डलीजच्या मालकीची आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार कॅडबरीने भ्रष्टाचार केला आहे.
कंपनीने क्षेत्र आधारित (बद्दी, हिमाचल प्रदेश) मिळणाऱ्या कर सवलत नियमांचे चुकीच्या पद्धतीने पालन केले आहे आणि कर चोरी केली आहे.
वृत्तसंस्था आयएएनएसनुसार सीबीआयने सोलन, बद्दी, पिंजोर आणि मुंबई आदींच्या दहा ठिकाणी छापे टाकण्याचे काम केले. केंद्रीय उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंपनीने सरकारला कर रूपात 241 कोटींची फसवणूक केली.
हे अनियमिततेचे प्रकरण 2009-2011 दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या तपासणीनंतर सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे. आपल्या एफआयआरमध्ये सीबीआयने कंपनीवर अनेक आरोप केले आहेत.
12 लोकांना अटक करण्यात आली आहे :- या प्रकरणात सीबीआयने 12 जणांना अटकही केली आहे. यात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय कॅडबरी इंडियाचे उपाध्यक्ष विक्रम अरोरा आणि संचालक राजेश गर्ग आणि जेलबॉय फिलिप्स यांना अटक करण्यात आली आहे.
कंपनी जाणूनबुजून अज्ञान राहिली :- सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कंपनीने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लाच दिली, नियम व कायद्यांसह खेळली आणि क्षेत्रआधारित करात सूट देण्याच्या नियमांचा गैरफायदा घेतला. हिमाचल प्रदेशच्या बद्दी येथे कंपनी ज्या पद्धतीने टॅक्स बेनिफिट घेत आहे वास्तविक कंपनी तसे करण्यास पात्र नाही.