स्पेशल

Ladki Bahin Yojana: पुन्हा जमा होणार ‘त्या’ महिलांच्या खात्यामध्ये 3000! राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Published by
Ajay Patil

Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना या योजनेला महिलांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देण्यात येत आहे.

आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ मिळणार असून या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. जर सध्या आपण या योजनेची स्थिती पाहिली तर ज्या महिलांनी 31 जुलै च्या अगोदर अर्ज केले होते अशा महिलांच्या खात्यामध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान तीन हजार रुपये जमा करण्यात आले.

हे तीन हजार रुपये जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून महिलांच्या खात्यात थेट जमा झाले. परंतु बऱ्याच महिला अजून देखील या योजनेपासून वंचित आहेत व त्यामागील प्रमुख कारण म्हणजे बऱ्याच महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे.

या व्यतिरिक्त बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले होते. परंतु अचानक बँकेने ही रक्कम काढून घेतली व त्यामुळे अनेक महिलांना याबाबत फार मोठा धक्का बसला होता व त्याबाबत आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 काय आहे राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय?

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 31 जुलैच्या आधी अर्ज दाखल केलेले होते अशा पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले होते. परंतु अनेक महिलांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये पुरेसा बॅलन्स न ठेवल्यामुळे बँकांच्या माध्यमातून त्यावर इंटरेस्ट लावण्यात आलेला होता.

अशावेळी जेव्हा या योजनेचे तीन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात आले तेव्हा ती रक्कम इंटरेस्टच्या स्वरूपामध्ये वजा करण्यात आलेली होती. त्यामुळे बऱ्याच महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळाला परंतु त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया देखील राहिला नव्हता व त्यामुळे महिलांना मोठा झटका बसला होता.

त्यामुळे अनेक महिलांनी या संबंधीच्या तक्रारी केलेल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे आता महिलांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कुठल्याही पद्धतीत कपात करू नये

अशा सूचना महिला व बाल विकास विभागाने बँकांना दिल्या आहेत व इतकेच नाही तर महिलांना या योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा स्पष्ट सूचना सर्व बँकांना देण्यात आलेले आहेत.

त्यामध्ये लाभार्थ्याचे जर काही कर्ज थकीत असले तरी देखील या योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत व कोणत्याही कारणामुळे लाभार्थ्याचे बँक खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असे निर्देश देखील बँकांना देण्यात आले असल्याची महत्त्वपूर्ण माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक महिलांच्या खात्यात पुन्हा तीन हजार रुपये जमा होणार असून या निर्णयामुळे नक्कीच महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil