Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाचणार आहे. दरम्यान याच विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राज्यातील महायुती सरकारने महिलांना आकर्षित करण्यासाठी काही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही देखील अशीच एक योजना आहे. या योजनेची सुरुवात झाल्यापासून याची चर्चा आहे.
या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच एका वर्षात एका पात्र महिलेला 18 हजार रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार आहे. यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला यांच्या लाभासाठी पात्र ठरतील. महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी अर्ज करू शकते. आतापर्यंत या योजनेचे दोन महिन्यांचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये काही पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीला ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्यांना प्रत्यक्षात याचा लाभ मिळाला आहे. राज्यातील जवळपास दीड कोटीहून अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. परंतु ज्या महिलांनी ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबर मध्ये अर्ज भरले आहेत त्या महिलांना या योजनेचा पैसा नेमका कधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, आता आपण याच संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट दिली आहे. खरंतर, या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत होती.
मात्र या योजनेची लोकप्रियता पाहता आणि पात्र महिला वंचित राहण्याची भीती पाहता महायुती सरकारने या योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
पण ऑगस्ट च्या शेवटी आणि सप्टेंबर मध्ये अर्ज सादर केलेल्यांना याचा लाभ कधी मिळणार ? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, ऑगस्ट अन सप्टेंबरचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहेत. म्हणजेच तिसरा हप्ता देखील लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
ज्यांना आधीचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना देखील लाभ मिळणार आहे. ज्यांना आधीचे दोन हप्ते मिळाले आहेत त्यांना सप्टेंबर चा लाभ मिळणार आहे. यामुळे राज्यातील कोट्यावधी महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे भाव पाहायला मिळतील. या निर्णयाचा सणासुदीच्या दिवसात महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.