स्पेशल

लाडकी बहिण योजनेच्या अर्जात चूक झाल्यास काय होणार ? अर्जात चूक झाली तर लाभ कसा मिळणार ? वाचा….

Published by
Tejas B Shelar

Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी अर्ज सादर केला आहे. राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचे अर्ज एक जुलैपासून भरले जात असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

यामुळे सध्या सर्वत्र या योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. मात्र या योजनेसाठी घाईघाईने अर्ज भरले जात असून यामुळे महिलांकडून मोठ्या प्रमाणात चुकाही होत आहेत.

खरे तर या योजनेचा राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना लाभ मिळणार आहे. याचा लाभ वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळणार आहे. याचा लाभ फक्त राज्यातील महिलांना मिळणार आहे.

परंतु ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार आहे.

19 ऑगस्ट आधीच या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. मात्र, जर या योजनेचा अर्ज चुकला असेल तर अशा महिलांना याचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न महिला वर्गाच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय.

तसेच या योजनेचा अर्ज चुकला असेल तर तो अर्ज दुरुस्त कसा करायचा याबाबतही महिला वर्गाकडून सातत्याने विचारणा केली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की लाडकी बहिण योजनेसाठी नारीशक्ती दूत या एप्लीकेशन वर आणि पोर्टलवर अर्ज सादर केले जात आहेत.

तसेच अर्ज भरताना जर काही चुका झाल्या तर एप्लीकेशन वर आणि पोर्टलवर या चुका दुरुस्त केल्या जाऊ शकतात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लाडकी बहीण योजनेसाठी एकदा अर्ज दाखल केला की, तो अर्ज In Pending To Submitted असा दिसतो.

याचा अर्थ असा की सादर करण्यात आलेला अर्ज हा सबमीट झाला असून तो प्रशासकीय पातळीवर पडताळला जात आहे. म्हणजेच सादर झालेला अर्ज हा सरकारकडे सबमीट झाला आहे आणि त्याची सध्या पडताळणी करण्याचे काम केले जात आहे.

पण, सादर झालेला अर्ज मंजूर आहे की तो नामंजूर होईल हे नंतरच्या काळात समजणार आहे. मात्र, सादर झालेला अर्ज दुरुस्त करता येतो. In Pending To Submitted याच ऑप्शनखाली अर्ज दुरुस्त करण्याचा पर्याय अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

In Pending To Submitted याच्या खालीच केशरी रंगाच्या पट्टीत Edit Fofm असा ऑप्शन मिळतो. याच ऑप्शनवर क्लिक करून अर्जात बदल करता येतो. एकंदरीत अर्ज भरताना जर चूक झाली असेल तर असा अर्ज नामंजूर केला जाणार आहे. मात्र हा अर्ज एडिट करण्याचा म्हणजेच दुरुस्त करण्याचा पर्याय अर्जदारांना दिला जात आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar