ब्रेकिंग : लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात ! तुमच्या खात्यात आले की नाही?

सध्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा असावा उपस्थित केला जातोयं. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच मोठी माहिती दिली त्यांनी सांगितले की एप्रिल महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात 2100 चा हप्ता देण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या जोरावरच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. दरम्यान महायुतीने आपल्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये देऊ अशी ग्वाही दिली होती.

यामुळे सध्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आम्हाला 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा असावा उपस्थित केला जातोयं.

यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतेच मोठी माहिती दिली त्यांनी सांगितले की एप्रिल महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात 2100 चा हप्ता देण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे.

तर दुसरीकडे डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या आणि ज्या महिलांना मागच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत अशा महिलांसाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते पण त्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, काही महिलांना एक -दोन महिन्यांचेच पैसे मिळालेत, अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

शुक्रवारपासून ज्या महिलांचे पैसे रखडलेले होते त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

तसेच 2100 रुपयांचा हफ्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे, पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये जमा होऊ शकतात. पण ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe