Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे फडणवीस सरकार लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी महिन्याचा पैसा जमा करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत.
दरम्यान आता या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 14 जानेवारीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये होतोय. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे आणि याच मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे दिले जातील असे म्हटले जात आहे.
मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याने नक्कीच ही लाडक्या बहिणीसाठी एक मोठी भेट करण्याची शक्यता आहे. जानेवारी चे पैसे येत्या काही दिवसांनी खात्यात जमा झाले तर लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करता येईल अशी आशा आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्यांचे एकूण 9 हजार रुपये आत्तापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत.
डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात येणार कां? हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता.
मात्र आता राज्यातील फडणवीस सरकार योग्य टायमिंग साधणार असे दिसत असून या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा 14 जानेवारीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होईल जेणेकरून महिलांना मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करता येईल अशी आशा आहे.
दुसरीकडे राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता दिला जाऊ शकतो असेही म्हटले जात आहे. मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना प्रत्यक्षात 2100 रुपये प्रति महिना असा लाभ मिळणार आहे.