Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेअंतर्गत राज्यातील पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.
21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ दिला जात असून आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीतील पाच महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आले आहेत.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे 7,500 रुपये पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजनेची जादू पाहायला मिळाली. योजनेच्या जोरावर पुन्हा एकदा महायुतीने सत्ता काबीज केली आहे.
येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचे नवीन सरकार राज्यात येणार आहे. सध्या महायुतीच्या खेम्यात मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू आहे लवकरच ही चर्चा अंतिम रुप घेईल आणि नवीन सरकार राज्यातील असे म्हटले जात आहे.
नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे. मात्र या योजनेच्या नियमात थोडेफार बदलही होण्याची शक्यता आहे.
योजनेसाठी जे निकष लावून देण्यात आले आहेत त्यात थोडा बदल होण्याची शक्यता असून यामुळे काही महिलांना याचा फटका सुद्धा बसू शकतो असे म्हटले जात आहे.
आणि आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्याच्या निकषांनुसार एका कुटुंबात किती महिलांना योजनेचा लाभ मिळणार यावर कोणतीच मर्यादा नाहीये.
म्हणजेच एका कुटुंबातील अनेक महिला याचा लाभ घेत आहेत. मात्र, आगामी काळात एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाचं या योजनेचा लाभ घेता येईल, असे बोलले जात आहे.
नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणाअंतर्गत या योजनेत बदल केले जाणार आहेत.
‘लाडकी बहिण’ योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी जाहीर केली आहे. या अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना लाभ मिळतोय. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना याचा लाभ दिला जातोय.