स्पेशल

ब्रेकिंग ! लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार

Published by
Tejas B Shelar

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही शिंदे फडणवीस पवार सरकारने अलीकडे जाहीर केलेली योजना आहे. या योजनेची जेव्हापासून घोषणा झाली आहे तेव्हापासूनच ही योजना चर्चेत आहे. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात 18,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.

आत्तापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पैसे नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.

ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधीच अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे 4500 मिळाले आहेत पण ज्यांनी

सप्टेंबर महिन्यात अर्ज केले होते त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत. अशातच, आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पुढील दोन महिन्यांचे अर्थातच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे दिवाळीच्या आधीच भाऊबीज ओवाळणी म्हणून पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची मोठी घोषणा बीड येथील एका सभेत केली आहे.

अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद यात्रा काढली असून त्यांची ही यात्रा काल मराठवाड्यातील बीडमध्ये पोहोचली. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे त्यांनी लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला आणि यावेळी बोलताना त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे दिवाळीच्या आधीच मिळणार अशी घोषणा केली.

महत्त्वाचे म्हणजे या जाहीर सभेत बोलताना अजितदादांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे कोणत्या तारखेला मिळणार हे देखील जाहीर केले आहे.

अजितदादा यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात असे संकेत दिलेत.

10 ऑक्टोबरला आगामी दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करू हा अजितदादांचा वादा आहे असं म्हणतं लाडक्या बहिणींसाठी ही मोठी घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला पात्र राहणार आहेत. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळेल. सोबतच कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरणार हे विशेष.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com