Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला पात्र ठरणार असून यासाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
सुरुवातीला अर्ज सादर करण्याची मुदत ही 31 ऑगस्ट होती मात्र नंतर ही मुदत वाढवली गेली. त्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत इच्छुक आणि पात्र महिलांना यासाठी अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्यास आणखी एका महिन्याची मुदत वाढ मिळू शकते असाही दावा प्रसार माध्यमांमध्ये केला जातोय.
यामुळे या योजनेला मुदतवाढ मिळणार का ही गोष्ट पाहण्यासारखी ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेसाठी ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज सादर केलेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळालेत.
31 जुलैच्या आधी अर्ज मंजूर झालेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळालेत. आता या महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत. ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत.
29 सप्टेंबरला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहेत. म्हणजे ज्यांना आधी दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत त्यांना 29 सप्टेंबरला फक्त पंधराशे रुपये मिळतील आणि ज्यांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले आहेत अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत.
पण ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे त्यांना किती रुपये मिळणार हा मोठा प्रश्न आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केला आहे आणि ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांना फक्त आणि फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
अर्थातच सप्टेंबर मध्ये अर्ज केलेल्या आणि अर्ज मंजूर झालेल्या महिलांना गेल्या दोन महिन्यांचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये दिले जाणार नाहीत. पण सप्टेंबर पासून पुढे त्यांना या योजनेचा रेगुलर लाभ मिळत राहणार आहे. यामुळे महिलांना देखील मोठा दिलासा मिळणार अशी आशा आहे.