Ladki Bahin Yojana : मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरंतर एमपी सरकारच्या धर्तीवर सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरवर्षी 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे.
यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र ठरणार आहेत. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ मिळणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र राहतील.

यासाठी कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील अर्ज करू शकते म्हणजेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील या अंतर्गत लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या महत्त्वाकांक्षी योजनेचे पैसेही आता मिळू लागले आहेत.
या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले तर त्या महिलांना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या योजनेचे पैसे मिळाले आहेत. अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये म्हणजेच एकूण तीन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र अशाही काही महिला आहेत ज्यांनी अर्ज करूनही त्यांना याचा लाभ मिळालेला नाहीये.
अर्थातच अशा संबंधित महिलांचे अर्ज अजून मंजूर झालेले नाहीत. यामुळे या अर्जदार महिलांच्या माध्यमातून त्यांना योजनेचे पैसे मिळालेले नसल्याने त्यांनी आता पुढे काय केले पाहिजे? याबाबतची तक्रार कुठे केली पाहिजे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान आज आपण याच संदर्भात अगदी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
फॉर्म भरल्यानंतरही पैसे जमा झाले नाही तर काय करणार
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल अन अजून पैसे मिळाले नसतील अशा महिलांनी नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवर जाऊन नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेल्या अर्जाची स्थिती तपासली पाहिजे.
यापूर्वी केलेले अर्ज या टॅब वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जासमोर Approved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे दिसतील. जर तुमच्या अर्जापूर्वी Approved असं लिहिलं असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील. पण Disapproved, Pending, Rejected असं लिहिलेलं असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा झालेलं नसतील.
जर तुमच्या अर्जापुढे Disapproved असं लिहलं असेल तर अर्ज रद्द करण्याचे कारण पाहण्यासाठी व्ह्यू रीजन या ऑप्शन वर क्लिक करून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. यासाठी Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा. पण Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घेणे आवश्यक आहे.
येथे संपर्क साधावा ?
तुम्हाला राज्य शासनाच्या या महत्त्वाकांशी योजनेची अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही 181 या महिला व बाल विकास विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. विशेष म्हणजे या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमची तक्रारही दाखल करू शकता.
यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक व्हाट्सअप हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. 98617 17171 हा तो हेल्पलाइन क्रमांक आहे. या क्रमांकावर व्हाट्सअप केल्यास लाडकी बहीण योजनेच्या समस्या दूर होणार आहेत.