महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नसल्याने लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता लांबणार ! कधीपर्यंत मिळणार 6व्या हफ्त्याचे पंधराशे रुपये ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे 30 नोव्हेंबरला किंवा एक डिसेंबरला महाराष्ट्रात शपथविधीचा सोहळा होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेता लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्यात जमा होईल असे दिसते.

Tejas B Shelar
Published:
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकांच्या आधी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे पैसे वितरित करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ॲडव्हान्स मध्ये ऑक्टोबर महिन्यातचं जमा करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार यामुळे नोव्हेंबर महिन्यात पैसे वर्ग करता येणार नाही हे ओळखून शिंदे सरकारने लाडकी बहिण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच जमा केलेत.

पण, आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार हा मोठा सवाल आहे. दरम्यान, आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे.

खरे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीचा निकाल लागला की लगेचच म्हणजेच नोव्हेंबर अखेरीस पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा केले जातील असे विधान केले होते.

म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांना नोव्हेंबर महिन्यातच ऍडव्हान्स म्हणून जमा केले जाणार असे त्यांनी म्हटले होते. ज्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्यातच मिळाले अगदी त्याच धर्तीवर डिसेंबर महिन्याचे पैसे देखील नोव्हेंबर महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. खरे तर महायुतीचा अजून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाहीये. येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत महायुतीकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर मग राज्यात नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे 30 नोव्हेंबरला किंवा एक डिसेंबरला महाराष्ट्रात शपथविधीचा सोहळा होऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेता लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबर महिन्यात जमा होईल असे दिसते. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या पुढील सहाव्या हफ्त्यासाठी महिलांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe