स्पेशल

LIC ची जबरदस्त पॉलिसी, 243 रुपयांच्या प्रीमियमवर मिळणार तब्बल 54 लाखाचा फायदा, वाचा याविषयी सविस्तर

Published by
Tejas B Shelar

LIC New Policy Scheme : भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. हेच कारण आहे की आजही सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक पाहायला मिळते. अलीकडे आपल्या देशात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जबरदस्त परताव्याच्या योजना देखील गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र असे असले तरी, या ठिकाणी रिस्क मोठ्या प्रमाणात असते यामुळे अनेकजण येथे गुंतवणूक करणे टाळतात.

आपल्या देशात पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरम्यान, आज आपण एलआयसीच्या अशाच एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण एलआयसीच्या अशा बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये 243 रुपयांच्या प्रीमियमवर गुंतवणूकदारांना तब्बल 54 लाखाचा फायदा मिळणार आहे.

कोणती आहे ती योजना

एलआयसीची जीवन लाभ एक लोकप्रिय जीवन विमा पॉलिसी योजना आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना डेथ बेनिफिट मिळतो, सोबतच मॅच्युरिटी बेनिफिट देखील मिळतो.

जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिला तर त्याला विम्याची रक्कम, बोनस आणि अतिरिक्त बोनसचा लाभ मिळतो.

ही पॉलिसी तीन टर्ममध्ये उपलब्ध आहे (16 वर्षे, 21 वर्षे आणि 25 वर्षे) पण प्रीमियम पे टर्म (10 वर्षे, 15 वर्षे आणि 26 वर्षे) असे आहेत.

कसे मिळणार 54 लाख

जर समजा एखादा व्यक्ती त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी 25 वर्षांसाठी 20 लाख रुपयांची विमा रक्कम योजना घेतली तर त्या व्यक्तीला 243 रुपये प्रति दिवसाचा प्रीमियम सोळा वर्षापर्यंत भरावा लागणार आहे.

यानंतर त्याला पॉलिसी सुरू केल्यानंतर 25 वर्षांनी म्हणजेच जेव्हा त्याचे वय 50 वर्षे एवढे राहिले तेव्हा 54 लाख रुपये मिळणार आहेत.

निश्चितच एलआयसीची ही पॉलिसी योजना खूपच फायदेशीर ठरणार असून यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com