स्पेशल

LIC Policy: एलआयसीच्या ‘या’ योजनेमध्ये एकदाच गुंतवा पैसे आणि महिन्याला मिळवा 12388 रुपये पेन्शन! उतारवयात नाही राहणार पैशांचे टेन्शन

Published by
Ajay Patil

LIC Policy:- आयुष्याच्या उतारवयामध्ये आपल्याला पैशांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये याकरिता आतापासूनच नियोजन करून ठेवणे खूप गरजेचे असते. आपल्याला माहित आहे की केंद्र किंवा राज्य सरकारचे जे काही कर्मचारी असतात त्यातील बहुतेकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळत असते.

परंतु नोकरी नसलेल्या व्यक्तींना मात्र आयुष्याच्या उतारवयामध्ये पैशांच्या बाबतीत कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये याकरिता वेगवेगळ्या असलेल्या पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करून उतारवयात मासिक पेन्शन मिळवण्याचा दृष्टिकोनातून नियोजन करणे गरजेचे असते.

याकरिता एलआयसीची एक अशी योजना आहे जी एक रकमी गुंतवणुकीतून दरमहा पेन्शन देते व या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रीमियम न भरता फक्त एकदा गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

 एलआयसीची सरल पेन्शन योजना आहे महत्त्वाची

एलआयसीची सरल पेन्शन योजना ही एकरकमी गुंतवणुकीवर निवृत्तीनंतर व्यक्तीला दरमहा पेन्शनचा लाभ देते.ही एक नॉन लिंक्ड, सींगल प्रीमियम योजना असून याच्या माध्यमातून लोकांना सुरक्षित व आरामदायी  सेवानिवृत्ती प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण काम करते.

 या योजनेचा लाभ कोणत्या व्यक्तींना मिळतो? किती प्रीमियम भरावा लागेल?

एलआयसीच्या सरल पेन्शनचा लाभ 40 ते 80 वर्ष वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला घेता येऊ शकतो. महत्वाचे म्हणजे एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेचा लाभ एकल म्हणजेच एकट्या किंवा जोडीदारासह( पती किंवा पत्नी) घेता येतो. तसेच या योजनेमध्ये तुम्हाला वर्षाला किंवा महिन्याला प्रीमियम भरण्याची गरज भासत नाही.

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो व त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला पेन्शनचा लाभ संपूर्ण आयुष्यभर मिळत राहतो. या योजनेमध्ये मिळणारी पेन्शनची जी काही रक्कम असते त्यामध्ये वाढ होत नाही.

यामध्ये सुरू झालेली पेन्शन एक निश्चित रकमेपासून सुरू होते व तितकीच रक्कम आयुष्यभर मिळत राहते. तुम्हाला जर ही पॉलिसी सरेंडर करायची असेल तर पॉलिसी सुरू केल्यानंतर सहा महिन्यात तुम्ही सरेंडर करू शकतात.

 किती मिळते पेन्शन?

यामध्ये कमाल पेन्शनची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. तुम्ही जितकी जास्तीत जास्त रक्कम यामध्ये एकरकमी गुंतवाल तितकी जास्त पेन्शनचा लाभ तुम्हाला मिळतो. या योजनेमध्ये तुम्हाला अँन्यूटी खरेदी करावी लागते.

समजा तुम्ही वयाच्या 42 वर्षाचे झाले आहात आणि तुम्ही तीस लाख रुपयांची अँन्यूटी खरेदी केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 12 हजार 388 रुपये मासिक पेन्शन मिळते. तुम्ही जास्त रक्कम गुंतवली तर पेन्शनचा लाभ हा जास्त मिळतो.

 या सुविधा देखील मिळतात

1- या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कर्जाचा लाभ देखील घेऊ शकता. तुम्हाला जर आर्थिक गरज भासली व तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर ही योजना सुरू झाल्यानंतर सहा महिने झाले असतील तर  तुम्ही या योजनेच्या माध्यमातून कर्जाकरिता अर्ज देखील करू शकतात.

2- दुसरे महत्त्वाचे म्हणजे पॉलिसीधारक जर आजारी पडला व त्याला उपचारासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही पॉलिसी सरेंडर करू शकतात व अशाप्रकारे पॉलिसी सरेंडर केल्यावर तुम्हाला मूळ किमतीच्या 95 टक्के रक्कम परत मिळते.

3- दुर्दैवाने जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला मूळ प्रीमियम परत दिला जातो.

Ajay Patil