LIC ची जबरदस्त योजना ; एकदा पैसा गुंतवा अन आयुष्यभर मिळवा 12 हजारांची पेन्शन, वाचा सविस्तर

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ने प्रत्येक श्रेणीतील लोकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. LIC द्वारे पेन्शन सारख्या योजना देखील ऑफर केल्या जातात. दरम्यान, जर तुम्हीही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर एलआयसीची एक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे.

Tejas B Shelar
Published:
LIC Saving Scheme

LIC Saving Scheme : प्रत्येकाला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे असते. यासाठी अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तसेच एलआयसीच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC ने प्रत्येक श्रेणीतील लोकांसाठी विविध योजना आणल्या आहेत.

LIC द्वारे पेन्शन सारख्या योजना देखील ऑफर केल्या जातात. दरम्यान, जर तुम्हीही पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर एलआयसीची एक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे.

यात कोणताही धोका नसून तुम्हाला दर महिन्याला नियमित उत्पन्न अर्थातच पेन्शनचा लाभ मिळत राहणार आहे. चला तर मग वेळ न दवडता या योजनेबद्दल सर्व काही जाणून घेऊयात.

कोणती आहे ती योजना?

आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे LIC सरल पेन्शन योजना, जी निवृत्तीनंतर दरमहा निवृत्तीवेतनाची हमी देते. विशेष बाब अशी की, तुम्हाला यामध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे आणि तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील.

LIC सरल पेन्शन योजना ही खूपचं प्रसिद्ध आहे. या योजनेमुळे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळू शकते. LIC च्या या योजनेबद्दल बोलायचे झाले तर, यात 40 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक गुंतवणूक करू शकतात.

40 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही. तुम्ही यात 80 वर्षांपर्यंत कधीही गुंतवणूक करू शकता. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्ही वार्षिक किमान १२ हजार रुपयांची वार्षिकी खरेदी करू शकता.

या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही, तुम्ही या योजनेत तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करू शकता. या पॉलिसी योजनेअंतर्गत, कोणताही नागरिक एकदा प्रीमियम भरून वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतो.

एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर 42 वर्षांच्या कोणत्याही व्यक्तीने 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केली तर त्याला दरमहा 12,388 रुपये पेन्शन मिळेल.

म्हणजे 30 लाख गुंतवले तर त्याला 12 हजार 388 रुपये पेन्शन मिळणार आहे. पॉलिसी घेतल्यानंतर 6 महिन्यानी ही पॉलिसी सरेंडर करता येते. या अंतर्गत तुम्ही लोन सुद्धा घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe