स्पेशल

सणासुदीला एसयूव्ही कार खरेदी करायची आहे का? ‘या’ मॉडेल्सवर मिळत आहे 1.80 लाखापर्यंत सूट, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही खरेदी करण्याच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत असून 2024 च्या पहिल्या सहामाहीत भारतातील एकूण कार विक्री पैकी 52 टक्के वाटा एकट्या एसयुव्ही सेगमेंटचा होता. तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असून अनेक आघाडीच्या कार उत्पादक कंपन्या सप्टेंबर महिन्यात

त्यांच्या लोकप्रिय मॉडेलवर बंपर सूट देत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार या काळात ग्राहक नवीन एसयूव्ही खरेदीवर कमाल एक लाख 80 हजारापर्यंत बचत करू शकणार आहेत. त्यामुळे या लेखात आपण कोणत्या एसयूव्ही वर किती सूट मिळत आहे याबद्दलची माहिती या लेखात बघू.

 या एसयूव्ही कार्सवर मिळत आहे सूट

1- टाटा सफारी देशांतर्गत कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स सप्टेंबर महिन्यात त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही सफारीवर बंपर सूट देत आहे. या महिन्यात ग्राहकांनी टाटा सफारी खरेदी केल्यास ते जास्तीत जास्त एक लाख 80 हजार रुपयांची बचत करू शकतात. बाजारामध्ये सध्या टाटा सफारी ची एक्स शोरूम किंमत 16 लाख 19 हजार रुपये ते टॉप मॉडेलसाठी 27 लाख 34 हजार रुपये आहे.

2- टाटा हॅरियर टाटा मोटर सप्टेंबर महिन्यात त्यांच्या आणखी एका लोकप्रिय एसयूव्ही हॅरियरवर एक लाख 60 हजार रुपयापर्यंत सूट देत आहे. येत्या काही दिवसात कंपनी टाटा हॅरियरचे इलेक्ट्रिक वेरियंट बाजारात आणण्याच्या तयारीत असून टाटा हॅरिअरची भारतीय बाजारपेठेत एक्स शोरूम किंमत पंधरा लाख 49 हजार ते टॉप मॉडेलसाठी 26 लाख 44 हजार रुपये आहे.

3- महिंद्रा थार देशांतर्गत कार उत्पादक कंपनी महिंद्रा सप्टेंबर महिन्यात त्यांच्या लोकप्रिय तीन डोर थार वर बंपर सूट देत असून जर ग्राहकांनी सप्टेंबर महिन्यात महिंद्रा थार खरेदी केली तर ते या कालावधीत एक लाख 55 हजार रुपये पर्यंत बचत करू शकणार आहेत. भारतीय बाजारपेठेत महिंद्रा थारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11 लाख 25 हजार रुपये ते 17 लाख साठ हजार रुपये पर्यंत आहे.

4- मारुती ग्रँड विटारा मारुती सुझुकी भारतातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी असून सप्टेंबर महिन्यात त्यांच्या लोकप्रिय एसयुव्ही ग्रँड विटारावर बंपर सूट देत आहे.

या कालावधीत मारुती सुझुकी ग्रंड विटारा खरेदीवर ग्राहकांना जास्तीत जास्त एक लाख 23 हजार रुपयांपर्यंत सुट मिळणार असून सध्या भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी ग्रँड विटाराची सुरुवातीची एक्स स्वरूप किंमत दहा लाख 99 हजार ते वीस लाख 9 हजार रुपयापर्यंत आहे.

5- टाटा नेक्सन टाटा मोटर्स नेक्सन वर देखील बंपर सवलत देत असून सप्टेंबर महिन्यात जर टाटा नेक्सन खरेदी केली तर ग्राहकांना 80 हजार रुपयापर्यंत सूट मिळणार आहे. टाटा नेक्सनची भारतीय बाजारपेठेत सुरुवातीची एक्स शोरूम किंमत आठ लाख ते पंधरा लाख 50 हजार रुपयांपर्यंत आहे.

Ajay Patil