Lord Hanuman Fact : भारतात असे एकही गाव नाही जिथे बजरंगाचे मंदिर नाही. प्रत्येक गावात आपल्याला पवनपुत्र, राम भक्त हनुमामाचे मंदिर पाहायला मिळते. आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही बजरंग बलीचे दर्शन घेऊनच होते. पण तुम्ही हनुमानजीच्या मूर्तीचे निरीक्षण केले आहे का? मग तुम्हाला हनुमान आणि गदा हे समीकरण दिसलंच असेल.
गदा हे हनुमानाचे आवडते शस्त्र. म्हणून हनुमानाच्या जवळपास सर्वच प्रतिमा अन मूर्ती गदाधारी असते. याला एखादा अपवाद असू शकतो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की हनुमानाला ही गदा कोणी दिली असावी आणि त्यांच्या गदेचे नाव नेमके काय आहे. नाही ना, मग आज आपण याच प्रश्नांचे उत्तर पाहणार आहोत.
खरे तर हनुमानाजवळ जी गदा होती ती फारच खास होती. म्हणून प्रत्येक मूर्ती आणि चित्रात हनुमानजीच्या खांद्यावर आपल्याला गदा दिसते, पण त्यामागील कथा काय आहे ? ही गदा सामान्य शस्त्र नसून ती अत्यंत खास मानली जाते. हे शक्ती आणि विजयाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. धर्मग्रंथांमध्ये याबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी लिहिल्या आहेत. आज आपण धर्मग्रंथांमध्ये लिहिलेली हीच अद्भुत कथा जाणून घेणार आहोत.
बजरंगबलीला कशी मिळाली गदा
हनुमान जी भगवान श्री रामाचे निस्सीम भक्त आहेत, यात कुठलीच शंका नाही. त्यांच्यासारख रामभक्त दुसरं कोणी झालंही नाही अन कधी होणार आहे नाही. पण हनुमानजी यांना कलियुगात विशेष महत्त्व दिले गेले आहे. धर्मग्रंथात त्याच्या गदाविषयी सुंदर असे वर्णन करण्यात आले आहे.
धर्मग्रंथानुसार रामभक्त हनुमानाच्या गदेचे नाव कौमोदकी गदा असे होते अन जी स्वत:मध्येच अद्भुत शक्तीने भरलेली होती असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार ही गदा धनाचा देवता कुबेर यांनी बाल हनुमानाला भेट म्हणून दिली होती. कुबेरांनी हनुमानजींना आशीर्वादही दिला होता की या गदामुळे ते कोणत्याही युद्धात विजयी होतील.
याच कारणामुळे हनुमानजींच्या चित्रांमध्ये आणि मूर्तींमध्ये ते अनेकदा डाव्या हातात गदा धरलेले दाखवले आहेत. या वैशिष्ट्यामुळे त्यांना “वामहस्थगदायुक्तम्” असेही म्हणतात. हनुमानजींच्या गदेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप विशेष आहे.
ही गदा शक्ती, विजय आणि धैर्याचे प्रतीक मानली जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की हनुमानजी आपल्या गदेने राक्षसांचा नाश करतात आणि शिकवतात की सत्याचा नेहमी विजय होतो. हनुमान चालिसातही त्यांच्या गदेची महती सांगितली गेली आहे.
दर मंगळवार आणि शनिवारी भक्त हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्यांच्या गदेचे पूजन करतात. ही गदा आजही त्यांच्या भक्तांसाठी धैर्य आणि प्रेरणास्थान आहे. हेच कारण आहे की अनेक हनुमान भक्त तुम्हाला गळ्यात गदा धारण केलेले दिसतील.