LPG Gas Cylinder Expiry Date : तुमच्याही घरात एलपीजी गॅस सिलेंडर आहे ना ? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरंतर अलीकडे प्रत्येकच घरात तुम्हाला एलपीजी सिलेंडर पाहायला मिळेल. यासाठी केंद्र शासनाचे प्रयत्न कामी आले आहेत. केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्यांदा गॅस सिलेंडर मोफत भरून मिळाला आहे. शिवाय उज्वला योजनेअंतर्गत गॅस शेगडी देखील मोफत देण्यात आली आहे. तसेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर भरण्यासाठी 300 रुपयांपर्यंतची सबसिडी देखील दिली जात आहे.
म्हणजेच या लाभार्थ्यांना 900 रुपयांचा गॅस फक्त सहाशे रुपयांना मिळत आहे. यामुळे घरगुती गॅस ग्राहकांची संख्या अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान आज आपण एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
खरेतर, आपण जेव्हा गॅस वितरकाकडे जातो तेव्हा एलपीजी सिलेंडरचे वजन, सिलेंडरमधून आवाज येतोय का, तो कुठे लीक तर नाही ना, त्याचा वास तर येत नाही ना अशा विविध बाबी तपासून पाहतो. जे की खूपच आवश्यक देखील आहे.
मात्र, एलपीजी सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक करणे देखील खूपच आवश्यक असते. आता तुम्ही म्हणाल गॅस सिलेंडर कुठे एक्सपायर होते का ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो कीLPG गॅस सिलेंडर देखील इतर वस्तूंप्रमाणेच एक्सपायर होत असते.
म्हणून गॅस सिलेंडरवर देखील एक्सपायरी डेट दिली जाते. परिणामी जेव्हा-केव्हा तुम्ही गॅस सिलेंडर भरण्यासाठी जाल तेव्हा गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक करायला विसरू नका. दरम्यान आता आपण गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट सिलेंडरवर कुठे लिहिलेली असते? हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी चेक करणार गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट?
गॅस सिलेंडरच्यावर जी रिंग असते त्या रिंग खाली असणाऱ्या पट्टीवर सिलेंडरची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ही एक्सपायरी डेट मात्र एका विशिष्ट कोड मध्ये असते. यात अक्षर आणि संख्या यांचे कॉम्बिनेशन असते. यातील अक्षर महिन्यांची माहिती देते तर संख्या वर्षाची माहिती देतात.
जर समजा तुमच्या गॅस सिलेंडरवर A 27 असं लिहिलेल असेल तर तुमचा गॅस सिलेंडर 2027 मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत एक्सपायर होईल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या कोडमध्ये ABCD या अक्षरांचा वापर महिन्यांसाठी होतो. यातील A हे अक्षर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च, B हे अक्षर एप्रिल, मे आणि जून, C हे अक्षर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर D हे अक्षर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांसाठी असते.
म्हणजे जर तुमच्या गॅस सिलेंडरवर B 25 असं लिहलं असेल तर तुमच सिलेंडर हे एप्रिल ते जून 2025 या कालावधीत एक्सपायर होईल. दरम्यान ज्या कालावधीत सिलेंडर एक्सपायर होते त्यावेळी त्या सिलेंडरची पुन्हा टेस्टिंग केली जाते. म्हणजे ही सिलेंडरची एक्सपायर डेट नसून टेस्टिंग डेट असते. या तारखांना सदर सिलेंडरची हायड्रो टेस्ट केली जाते आणि ते सिलेंडर पुन्हा वापरासाठी योग्य आहे की नाही हे तपासले जाते.
जर या टेस्टिंग मध्ये एखादे सिलेंडर पुन्हा वापरासाठी योग्य नसल्याचे आढळले की ते सिलेंडर नष्ट केले जात. मात्र जे सिलेंडर वापरासाठी योग्य असतात ते सिलेंडर पुन्हा एकदा वापरासाठी पाठवले जाते. एलपीजी गॅस सिलेंडरचे आयुष्य पंधरा वर्षांचे असते या कालावधीत त्याची दोनदा चेकिंग होते. पहिली चेकिंग दहा वर्षांनी आणि दुसरी चेकिंग पाच वर्षांनी होते.