विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 10वी बोर्डाचा निकाल केव्हा लागणार? समोर आली नवीन तारीख

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून यावर्षी दहावीचा निकाल फारच लवकर जाहीर होणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी दहावीचे निकाल समोर येत असतात. यंदा मात्र दहावीचा निकाल 15 मे 2025 पूर्वीच जाहीर केला जाणार आहे. पुरवणी परीक्षांबाबत बोलायचं झालं तर पुरवणी परीक्षा या जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच होतील.

Updated on -

Maharashtra 10th Board Exam Result 2025 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा झाल्यात. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. दरम्यान दहावीची बोर्ड परीक्षा मार्च महिन्यात संपली अन त्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.

बोर्ड एक्झाम दिल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनाही निकालाची प्रतीक्षा आहे आणि विद्यार्थी आणि पालक दहावी अन 12वी चा निकाल नेमका कधी लागेल? अशी विचारणा करतांना दिसत आहेत.

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

आधी बारावीचे निकाल जाहीर केले जातील आणि त्यानंतर मग दहावीचे निकाल जाहीर होणार असा अंदाज आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक आठवडा किंवा दहा दिवसांच्या काळातच दहावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.

कधी जाहीर होणार दहावीचा निकाल?

मंडळाकडूनच सध्या एसएससी म्हणजेच दहावी बोर्डाचे एक्झाम पेपर तपासले जात आहेत. पेपर तपासणीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून यंदा वेळेच्या आधीच निकाल लागण्याची शक्यता आहे.

यावर्षी दहावीचा निकाल 15 मे 2025 आधीच जाहीर होणार आहे. असे झाल्यास राज्य मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल एवढ्या लवकर जाहीर होणार आहे.

एवढेच नाही तर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पुरवणी परीक्षा सुद्धा आयोजित केल्या जाणार आहेत. मागील काही वर्षात एसएससी आणि एचएससी म्हणजेच दहावी आणि बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर केले गेले आहेत.

यंदा मात्र 15 मे च्या आधीच बारावी आणि दहावीचे निकाल लागण्याची दाट शक्यता व्यक्त होताना दिसत आहे. दहावीचा निकाल यंदा 15 मे च्या आधी जाहीर होणार असे म्हटले जात असले तरी देखील याबाबत मंडळाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!