स्पेशल

Maharashtra Budget 2023 : मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा वाचा एका क्लिकवर

Published by
Ajay Patil

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर आज पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा अर्थसंकल्प सादर केला असून आपल्या भाषणात फडणवीस यांनी घोषणाचा पाऊस पाडला आहे.

आजच्या आपल्या या पहिल्या-वहिल्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. 2024 विधानसभा निवडणूकां आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा अर्थसंकल्प विशेष खास राहिला आहे.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. यासोबतच राज्यातील वेगवेगळ्या वर्गातील लोकांना खुश करण्यासाठी आजच्या अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांच्या घोषणा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज करण्यात आले आहेत. दरम्यान आज आपण फडणवीस यांनी कोण-कोणत्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पात केल्या आहेत याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणा

  1. फडणवीस यांनी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात देखील पीएम किसान योजनेसारख्या एका योजनेची घोषणा केली आहे. फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या कल्याणकारी योजनेची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा वार्षिक लाभ मिळणार आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
  2. यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एका रुपयात पिक विमा सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
  3. एवढेच नाही तर धनगर समाजाला खुश करण्यासाठी फडणवीस यांनी 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सोबतच महामंडळामार्फत दहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  4. जसं की आपणास ठाऊकच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे. याचेच औचित्य साधून शिंदे फडणवीस सरकारने शिवप्रभूंच्या शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे.
  5. राज्यातील पाच हजार गावात जलयुक्त शिवार अभियान दोन सुरू होणार आहे.
  6. यासोबतच महाराष्ट्रातील मुलींच्या कल्याणासाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. लेक लाडली योजना सया योजनेचे नाव असून या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर मुलीला 5000 रुपये, पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये, अकरावीत 8000 रुपये, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये देण्याचे प्रावधान राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
  7. आशा स्वयंसेविकाचे मानधन साडेतीन हजारावरून पाच हजार रुपये करण्यात आले आहे अर्थातच एक हजार पाचशे रुपयांची मोठी वाढ यावेळी या कर्मचाऱ्यांच्या मानधनात करण्यात आली आहे.
  8. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता तब्बल पाच लाखांपर्यंत उपचार करता येणे शक्य होणार आहे.
  9. यासोबतच एक कल्याणकारी योजना म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या संजय गांधी निराधार/ श्रावण बाळ योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. जस की आपणास ठाऊकच आहे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एक हजार रुपये दिले जात होते आता यामध्ये पाचशे रुपयांची वाढ करण्यात आली असून आता 1500 रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत.
  10. यासोबतच महिलांसाठी मोठी घोषणा या अर्थसंकल्पात झाली असून महिलांना आता एसटीमध्ये प्रवास करताना 50% एवढी सरसकट सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
  11. यासोबतच मोदी आवासं घरकुल योजनेचा देखील घोषणा करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्षात दहा लाख घर तयार केली जाणार आहेत.
  12. यासोबतच समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याची मोठी घोषणा यावेळी अर्थसंकल्पात झाली आहे. आता समृद्धी महामार्गाचा विस्तार हा सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत होणार असून हा चौपदरी रस्ता राहील अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
  13. राज्यातील भटक्या जाती आणि जमातींसाठी राज्य शासनाने मोठी घोषणा केली आहे यामध्ये प्रामुख्याने आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
  14. यासोबतच राजधानी मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून राजधानी मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 1729 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली आहे.
  15. यासोबतच महाराष्ट्रातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी देखील मोठी घोषणा झाली आहे. आता राज्यातील पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून पाच हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे. आधी मात्र 1000 रुपये दिले जात होते. तसेच 8वी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 7500 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आधी मात्र एक हजार पाचशे रुपये शिष्यवृत्ती होती.
  16. जसं की आपण पाहिलंच नुकताच राज्य शासनाने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करू असं सांगितलं होतं. ही देखील घोषणा आता अर्थसंकल्पात झाली असून आता शिक्षण सेवकांना दहा हजार रुपये सरासरी मानधन वाढ मिळणार आहे.
Ajay Patil

Published by
Ajay Patil