स्पेशल

‘हे’ आहे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशन! ठाण्याजवळच्या ‘या’ पर्यटन स्थळावर गेलात तर स्वर्गासारखा नजारा अनुभवायला मिळणार

Published by
Tejas B Shelar

Maharashtra Famous Hill Station : जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील एका लोकप्रिय हिल स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत. खरेतर, महाराष्ट्रात शेकडो हिल स्टेशन आहेत.

खंडाळा, महाबळेश्वर, भीमाशंकर, तोरणमाळ अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पण आज आपण अशा एका हिल स्टेशनची माहिती जाणून घेणार आहोत जे की खूपच छोटे आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय हिल स्टेशनच्या यादीमध्ये या हिल स्टेशनचा समावेश होतो.

आम्ही ज्या हिल स्टेशन बाबत बोलत आहोत ते हिल स्टेशन ठाण्यापासून अगदीच जवळ आहे. त्यामुळे येथे मुंबई आणि पुण्याहून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. खरे तर ठाण्याजवळ अनेक लोकप्रिय हिल स्टेशन्स आहेत.

माथेरान हे देखील असेच एक लोकप्रिय हिल स्टेशन असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. हे राज्यातील हॉट फेवरेट पिकनिक डेस्टिनेशन असून या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर राज्याबाहेरील लोक देखील मोठ्या प्रमाणात पिकनिक साठी येतात.

हे थंड हवेचे ठिकाण फारच सुंदर आहे. ठाण्याजवळ असणाऱ्या या हिल स्टेशनची उंची 800 मीटर एवढी आहे. या ठिकाणी असणारी हिरवळ पर्यटकांना भुरळ घालते. पर्यटकांसाठी हे हिल स्टेशन नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

या थंड हवेच्या ठिकाणाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे ठिकाण ठाण्यापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे. माथेरान ला जाण्यासाठी अनेक ट्रेन्स उपलब्ध आहेत.

हे ठिकाण ठाण्यापासून अवघ्या 72 किलोमीटरच्या अंतरावर वसलेले असून येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ राहते. माथेरानला अद्भुत असे नैसर्गिक सौंदर्य लाभले असून यामुळे याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.

यामुळे जर तुम्हीही तुमच्या परिवारासमवेत किंवा मित्रांसमवेत आगामी काळात कुठे पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्यासाठी माथेरानचा ऑप्शन सर्वोत्कृष्ट ठरणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com