काय ती हिरवळ, काय तो निसर्ग…! ‘हे’ आहेत राज्यातील 3 लोकप्रिय पर्यटन स्थळ ; पावसाळी पर्यटनासाठी ठरणार सर्वोत्कृष्ट

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Famous Picnic Spot

 

Maharashtra Famous Picnic Spot : भारतीय हवामान खात्याने लवकरच राज्यातील तळ कोकणात मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले आहे. 10 जूनच्या सुमारास मानसून कोकणसह मुंबईत दाखल होणार असा अंदाज आहे. एकंदरीत पावसाळा आता जवळ आला आहे. यामुळे, शेतकऱ्यांची पावले ज्याप्रमाणे शेतशिवाराकडे वळणार आहेत त्याचप्रमाणे पर्यटकांची पावले देखील पर्यटन स्थळांकडे वळणार आहेत.

पावसाळ्यात अनेक जण पिकनिक साठी बाहेर पडत असतात. यंदा देखील लाखोंच्या संख्येने पर्यटक पावसाळी पिकनिक साठी देशभरातील विविध पर्यटन स्थळांवर गर्दी करणार आहेत. काही लोक तर विदेशात पिकनिक साठी जाण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान जर तुम्हीही येत्या पावसाळ्यात कुठे बाहेर पिकनिक साठी जाणार असाल, तुमच्या परिवारासमवेत पावसाळी ट्रिपचे नियोजन करणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील टॉप 3 पावसाळी पिकनिक स्पॉट ची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पाचगणी हिल स्टेशन : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सर्वात सुंदर ठिकाण म्हणून पाचगणीची ओळख आहे. येथे बारा महिने पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र पावसाळा सुरू झाला की येथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ हा खूपच वाढत असतो. मान्सून मध्ये दरवर्षी येथे देश-विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी हजेरी लावत असतात.

हे हिल स्टेशन सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील पाच टेकड्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे कदाचित याला पाचगणी असे नाव पडले असावे. जर तुम्हीही या पावसाळ्यात येथे भेट देण्याच्या तयारीत असाल तर येथील टेबल लँड, सिडनी पॉइंट, भिलार फॉल्स, पारसी पॉइंट आणि राजपुरी लेणी या प्रसिद्ध पॉईंट ला भेट द्यायला विसरू नका.

ताम्हिणी घाट : पावसाळी पर्यटनासाठी आणखी एक बेस्ट ठिकाण म्हणजेच ताम्हिणी घाट. या घाटातील नैसर्गिक सौंदर्यता ही पावसाळ्यात अजूनच वाढते. हे ठिकाण मुंबईपासून 140 किलोमीटरच्या अंतरावर आहे.

येथील हिरवळ, डोंगरदऱ्या, सुंदर धबधबे, मुळशी धरण हे खूपच पाहण्यासारखे आहे. येथील मनमोहक दृश्य तुमची ट्रीप आनंददायी बनवणार आहेत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा कॉलिटी टाईम स्पेंड करण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण ठरणार आहे.

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व आजूबाजूचा परिसर हा नैसर्गिक सौंदर्यतेने नटलेला आहे. जर तुम्ही ही यंदाच्या पावसाळ्यात कुठे ट्रीप काढण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी इगतपुरी हे ठिकाण परफेक्ट ठरणार आहे.

तुम्ही इगतपुरीच्या आजूबाजूला असणारी अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, सुंदरनारायण गणेश मंदीर, कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांदण दरी, रंधा धबधबा ही काही प्रमुख ठिकाणे नक्कीच एक्सप्लोर केली पाहिजेत.