Maharashtra Government Employee News : सध्या राज्य कर्मचारी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा धर्तीवर 3% महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा करत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यातच तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना मात्र अजून हा लाभ देण्यात आलेला नाही.
त्यावेळेस महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पालिकेतील आस्थापना सूची वरील शेकडो कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील ३४३ कर्मचाऱ्यांना सर्व रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्ती देण्याचा निर्णय विभागीय पदोन्नती समितीने नुकताच घेतला असून या निर्णयामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
हा आदेश शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. खरंतर हा पदोन्नतीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता मात्र शुक्रवारी हा निर्णय घेऊन पालिका प्रशासनाने सदरील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
या पदोन्नत्ती सामान्य प्रशासन विभागाच्या मे २०२१ च्या पत्राच्या निर्देशानुसार सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आल्या आहेत याची नोंद कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, या तात्पुरत्या पदोन्नतीने संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नती पदाच्या ज्येष्ठतेचे कोणतेही अधिकार प्राप्त होणार नाहीत, असेही पदोन्नती आदेशात म्हटले गेले आहे. विशेष बाब अशी की, या पदोन्नत्या रद्द करण्याचा आदेश आयुक्तांनी आपल्याकडेच ठेवला आहे. पालिकेतील 343 कर्मचाऱ्यांना तात्पुरती का होईना पण पदोन्नतीचा लाभ मिळाला असल्याने या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी आनंदी आहेत.
दरम्यान, न्यायालयीन प्रकरणे, विभागीय चौकशी, गुन्हे दाखल कर्मचाऱ्यांंच्या पदोन्नतीचे प्रस्ताव सीलबंद लिफाफ्यात बंदिस्त ठेवण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांचा संदर्भातील अंतिम निकाल लागल्यानंतरच त्यांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतला जाईल असे एका अधिकाऱ्याने एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ कधी मिळणार?
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे राज्य कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ प्रलंबित आहे. आता विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून नवीन सरकार स्थापित झाले आहे. मात्र मध्यंतरी सत्ता स्थापनेचा मोठा घोळ पायाला मिळाला आणि यामुळे अजूनही राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही.
पण आता लवकरच फडणवीस सरकार या संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य कर्मचाऱ्यांना सध्या पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून हा महागाई भत्ता लवकरच 53% होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ मिळणार आहे.