Maharashtra New Expressway : गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात किंबहुना संपूर्ण देशात मोठ-मोठ्या महामार्गाची कामे पूर्णत्वास गेली आहेत. देशात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले असून या महामार्ग प्रकल्पांमुळे देशातील रस्ते कनेक्टिव्हिटी खूपच हायटेक झाली आहे.
पाश्चिमात्य देशांमधील रस्ते ज्या पद्धतीचे आहेत त्याच पद्धतीचे रस्ते आता भारतात देखील विकसित होत असून याच आधुनिक रस्त्यांमुळे शहरा शहरांमधील अंतर आता कमी होऊ लागले आहे. अशातच आता आणखी एक महत्त्वाकांक्षी रस्ते महामार्ग प्रकल्प सरकारने हाती घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरकार महाराष्ट्रातील दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांना एकमेकांना जोडण्याचे काम करणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकार मुंबई गोवा आणि मुंबई बेंगलोर या दोन राष्ट्रीय महामार्गांना परस्परांना जोडणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे यासाठी सरकारच्या माध्यमातून तब्बल 3500 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यासाठी 29 किलोमीटर लांबीचा ग्रीन कॉरिडॉर विकसित होणार असून हा ग्रीन कॉरिडोर जेएनपीए-पागोटे-चिरनेर ते चौक दरम्यान बांधला जाईल.
हा एक सहापदरी ग्रीन कॉरिडॉर राहणार आहे. या ग्रीन कॉरिडॉरमुळे मुंबई ते बेंगलोर हा प्रवास आणखी जलद होणार आहे. पुढील तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा मानस सरकारने बोलून दाखवला असून त्या दृष्टीने आता युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार असून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते बेंगलोर हा प्रवास अवघ्या सहा तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, ४८ आणि ३४८ या तीन महामार्गांसह तो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, मुंबई-गोवा आणि गोवा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालाही जोडणार आहे.
हेच कारण आहे की जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा मुंबई-बंगळुरू प्रवास सहा तासांत करणे सहज शक्य होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रस्तावित करण्यात आलेल्या 29 किलोमीटर लांबीच्या ग्रीन कॉरिडोर अंतर्गत चिरनेर आणि आपट्यादरम्यान दोन बोगदेही उभारण्यात येणार आहेत.
यात चिरनेर बोगदा १.९ किमीचा, तर आपटा बोगदा १.७ किमीचा आहे. या ट्वीन टनेलची लांबी ३.४७ किमी आहे. या मार्गावर सहा मोठ्या आणि पाच लहान पुलांसह सर्व्हिस रोड, स्लिप रोडचा समावेश राहणार आहे. सध्या या प्रकल्पाचा डीपीआर बनवण्याचे काम सुरू असून हा डीपीआर लवकरच फायनल होईल असे दिसते.
एवढेच नाही तर या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया देखील येत्या काही दिवसात राबवली जाणार आहे आणि टेंडर अंतिम करून या प्रकल्पासाठी वर्क ऑर्डर काढली जाईल आणि मग प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, जेव्हा टेंडर प्रक्रिया फायनल होईल आणि कॉन्ट्रॅक्टर नियुक्त होईल त्या कॉन्ट्रॅक्टरला वर्कऑर्डर दिल्यानंतर या प्रकल्पाचे काम अवघ्या 30 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करावे लागणार आहे.