Maharashtra News : केंद्र शासनाने भारतमाला परीयोजनेअंतर्गत संपूर्ण देशात 3000 किलोमीटर रस्ते बांधण्याचे योजिले असून या अनुषंगाने महामार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे सर्व महामार्ग हे ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहेत.
दरम्यान आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी देखील महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे विकसित करण्यासाठी एक रोड मॅप किंवा आराखडा तयार केला आहे. महाराष्ट्रात रस्ते महामंडळाकडून तब्बल पाच हजार तीनशे किलोमीटरचे महामार्ग विकसित केले जाणार आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कोणकोणते महामार्ग या योजनेअंतर्गत विकसित करण्याचे ठरविले आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
MSRDC च्या माध्यमातून हे रस्त्यांचे जाळे किंवा नेटवर्क तयार करण्यासाठी, राज्याने अलीकडेच पहिली पायरी म्हणून कागदोपत्री कार्यवाही सुरू केली. “सर्व प्रकल्पांचा अभ्यास करून तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे,” एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे “प्रकल्पाचा आकार प्रचंड मोठा असल्याने, तो एकत्र ठेवण्यासाठी काही महिने लागतील.” मोठ्या प्रकल्पामध्ये मुंबई-पुणे आणि मुंबई-नागपूर एक्सप्रेसवेसह 16 वेगवेगळ्या प्रकल्पांचा समावेश आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात सध्या एकूण 17,725 किमी राष्ट्रीय महामार्ग आणि 32,423 किमी राज्य महामार्ग आहेत, परंतु मुंबई आणि पुणे दरम्यान फक्त 94 किमीचा एक्स्प्रेस वे आहे. हायवे आणि एक्सप्रेसवेमध्ये फरक हा आहे की हायवेवर एकाधिक एंट्री आणि एक्जिट असतात तर एक्सप्रेसवे हे एक्सेस नियंत्रित आणि हाय-स्पीड ट्रॅफिकसाठी डिझाइन केलेले असतात. यामध्ये लिमिटेड इंट्री आणि एक्झिट पॉईंट असतात.
महामंडळाकडून या प्रकल्पचा प्रकल्प अहवाल तयार होत आहे. हा अहवाल हे महामार्गांचे नेटवर्क तयार करण्यासाठी आवश्यक असलेला एकूण भांडवली खर्च आणि टॅप करता येणारे वित्त पर्याय निश्चित करणार आहे. साहजिकच प्रोजेक्ट रिपोर्ट रस्ते विकासाच्या कामात एक महत्त्वाची भूमिका बजावतो.
पुढील दोन दशकांत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे एक्सप्रेस वेद्वारे जोडण्याची सरकारची योजना आहे. राज्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच, अशा भव्य पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळते.
ते अधिक शहरी आणि निमशहरी केंद्रे तयार करण्यात मदत करतात, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बहुतांश एक्सप्रेसवे ग्रीनफिल्ड प्रकल्प असतील कारण प्रस्थापित व्यावसायिक आणि निवासी जागांमधून जमीन संपादन करण्याच्या किंमती लक्षात घेता विद्यमान महामार्ग रुंद करणे अधिक महाग आहे.
कसं असेल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तयार होणारे रस्त्यांचे नेटवर्क
मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर: 700 किमी
मुंबई-पुणे: ९५ किमी
जालना-परभणी-हिंगोली-नांदेड: 200 किमी
नागपूर-भंडारा-गोंदिया: 150 किमी
पुणे-अहमदनगर-औरंगाबाद: 240 किमी
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: 500 किमी
वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-उस्मानाबाद-सोलापूर-सांगली-कोल्हापूर : 850 किमी
सिन्नर-धुळे-जळगाव: 250 किमी
पुणे-सोलापूर: 230 किमी
पुणे-सातारा-सांगली-कोल्हापूर: 230 किमी
औरंगाबाद-जळगाव: १६५ किमी
जळगाव-बुलढाणा-अकोला-अमरावती-नागपूर: 450 किमी
नागपूर-चंद्रपूर: 140 किमी
पुणे-अहमदनगर-बीड-परभणी-नांदेड: 470 किमी
धुळे-नंदुरबार (विसारवाडीपर्यंत)-सुरत: 115 किमी
पालघर-मुंबई: 100 किमी