देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लॅन ? महाराष्ट्रात 36 नाही 80 जिल्हे ! राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती

महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, पण राज्यातील जे जिल्हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहेत त्या जिल्ह्यांचे विभाजन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. राज्यात 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि नवीन पालघर जिल्हा तयार झाला. त्यानंतर मात्र राज्यात अजून एकही जिल्हा तयार झालेला नाही.

Published on -

Maharashtra New District: महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. शासन दरबारी राज्यात फक्त 36 जिल्हे असल्याची नोंद आहे, पण भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर महाराष्ट्रात 80 जिल्हे तयार केलेले आहेत. महत्वाची बाब अशी की यातील दोन जिल्हे यावर्षीच तयार झाले आहेत. दरम्यान या जिल्ह्यांमध्ये आता बीजेपीकडून नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली जात आहे आणि याच संदर्भातील सविस्तर माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

प्रशासकीय कामकाजासाठी जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे असा युक्तिवाद सातत्याने केला जातोय. राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे अशा जिल्ह्यांच्या विभाजनाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण नवीन जिल्हा तयार करायचे म्हटले तर त्यासाठी मोठा खर्चही करावा लागणार आहे.

यामुळे राज्य सरकारकडून नवीन जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होत नाहीये. एकीकडे महाराष्ट्रात 36 जिल्हे असल्याचे शासकीय नोंद आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 36 जिल्हे नसून 80 जिल्हे आहेत असे मानते.

भारतीय जनता पक्ष आपल्या संघटना पातळीवर राज्यात 80 जिल्हे असल्याचे मानते आणि या अनुषंगाने या 80 जिल्ह्यांसाठी भारतीय जनता पक्षाकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती सुद्धा केली जात आहे.

भाजपाने आतापर्यंत इतक्या जिल्हाध्यक्षांची निवड केली

खरं तर भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत महाराष्ट्रात 58 जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची निवड केलेली आहे. तर उर्वरित 22 जिल्ह्यांमधील जिल्हा अध्यक्षांची निवड आगामी काळात होईल अशी माहिती समोर येत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात भारतीय जनता पक्ष 80 जिल्ह्यांसाठी नवीन अध्यक्ष नियुक्त करणार असून या अनुषंगाने आतापर्यंत 58 जिल्ह्यांसाठी नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी देखील लवकरच नव्या अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे.

यंदा विदर्भात दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती

भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर विदर्भात दोन नव्या जिल्ह्यांची निर्मिती केलेली आहे. काटोल आणि अचलपूर – मेळघाट हे दोन नवीन जिल्हे बीजेपी कडून संघटनात्मक पातळीवर तयार करण्यात आले आहेत आणि या दोन जिल्ह्यांसाठी नवे अध्यक्ष सुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विदर्भातील वर्धा, चंद्रपूर (शहर व ग्रामीण) आणि गडचिरोली जिल्ह्यांत अध्यक्ष निवडीचा निर्णय अजून प्रलंबित आहे, पक्षांतर्गत गटबाजी तयार झाली असल्याने या संबंधीत जिल्ह्यात नवीन अध्यक्ष नियुक्त होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

विशेषतः वर्ध्यात तेली समाजाच्या नेतृत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गत कार्यकाळात या समाजाचा एकही जिल्हाध्यक्ष निवडला गेला नसल्याने तेली समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटला होता.

त्यामुळे यंदा वर्ध्याला तेली समाजाचा अध्यक्ष मिळावा यासाठी भाजपाच्या जेष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. माजी खासदार रामदास तडस, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व अन्य आमदार यांच्याकडून तेली समाजातील नेत्यांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News