स्पेशल

गुड न्यूज ! आता राज्यातील नागरिकांना पाऊस, हवामान, वादळाची अचूक माहिती मिळणार; ‘या’ ठिकाणी 60 अतिरिक्त स्वयंचलित हवामान केंद्र विकसित होणार

Published by
Ajay Patil

Maharashtra News : अलीकडे हवामानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाऊस, अतिवृष्टी गारपीट, वादळ यांसारख्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अनेकदा महापुर देखील येतो यामुळे जनजीवन विस्कळीत होते. याची मात्र पूर्वकल्पना नागरिकांना येत नसल्याने त्यांना नाहक अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिकांना रेशनिंग पासून ते भाजीपाला पर्यंत अशा आवश्यक गोष्टींची पूर्तता करतांना नाकी नऊ येत असतात. मात्र जर हवामानात होणाऱ्या बदलांची अचूक माहिती नागरिकांना देण्यात आली तर नागरिक सतर्क राहतील आणि आवश्यक गोष्टींची पूर्तता आधीच करून ठेवतील. यामुळे आता मुंबईकरांना पाऊस हवामान वादळ याची अचूक माहिती मिळावी यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.

राजधानी मुंबईत गेल्या काही वर्षांपासून पावसाचा लहरीपणा अनेकदा पहावयास मिळाला आहे. अनेकदा राजधानी मुंबईची तुंबई बनली आहे. अनेकदा संपूर्ण शहर पाण्याखाली जात असल्याने वाहतूक ठप्प होते आणि जीवनावश्यक वस्तूंची जमा जमा करताना नागरिकांना नाकी न येतात. मात्र आता पावसाची, हवामानाची, वादळाची पूर्वकल्पना मुंबईकरांना येण्यासाठी मुंबई पालिकेने 60 अतिरिक्त हवामान केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. खरं पाहता गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं.

त्याशिवाय राजधानी मुंबईत अनेक वादळे देखील आली. निसर्ग, तोक्ते वादळामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली. अशा परिस्थितीत मुंबईतील वाहतूक ठप्प बनते. यामुळे मुंबईकरांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागला आहे. अशातच आता पाऊस, तापमान, हवेचा वेग, वादळ याची माहिती नागरिकांना देता यावी म्हणून पालिकेने ६० अतिरिक्त स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याच्या निर्णय घेतला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राष्ट्रीय किनारपट्टी संशोधन केंद्राने (एनसीसीआर) या संस्थेने मुंबईमध्ये एकूण 97 अतिरिक्त हवामान केंद्रे बसवण्याची शिफारस केली होती. पावसाचे अचूक मोजमाप करण्यासाठी आणि एकात्मिक पूर पूर्वसूचना प्रणालीची पूर अंदाज क्षमता वाढविण्यासाठी ही शिफारस या संस्थेने केली होती.

दरम्यान आता या शिफारशीवर महापालिकेने गांभीर्याने लक्ष घातले असून 97 शिफारस केलेल्या अतिरिक्त हवामान केंद्रापैकी 60 स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी निविदा देखील काढल्या आहेत. यामुळे आता मुंबईकरांना पावसाचा आणि वादळाचा अचूक अंदाज मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प असल्याच्या कारणाने मुंबईकरांची हेळसांड होणार नाही.

या प्रकल्पासाठी निविदाकार रिअल टाइम पावसाची माहिती प्रदर्शित करणे आणि आपत्ती व्यवस्थापन वेबसाइट आणि अ‍ॅपची देखभाल करण्याची जबाबदारी देखील पार पाडणार आहे. विशेष बाब म्हणजे ही हवामान केंद्रे महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन ऑपरेशन सेंटरशी जोडली जाणार आहेत. निश्चितच यामुळे राजधानी मुंबईमध्ये वसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Ajay Patil