स्पेशल

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला मिळणार किमान 2 खासदार; राज्यातील खासदारांची संख्या 48 वरून 76 वर जाणार, केव्हा लागू होणार निर्णय?

Maharashtra News : देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. 2011 मध्ये यापूर्वी जनगणना झाली होती आणि 2021 मध्ये जनगणना करणे अपेक्षित होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जनगणना 2021 मध्ये झाली नाही.

मात्र आता ही जनगणना 2026 मध्ये किंवा 2031 मध्ये केली जाऊ शकते असे काही मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे. दरम्यान जनगणनेनंतर देशातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, येत्या जनगणनेनंतर संसदेतील सदस्यांची संख्या तब्बल 344 ने वाढणार आहे. म्हणजे 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार संख्या वाढलेली राहणार आहे.

महाराष्ट्रात किती खासदार बनणार?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या राज्यात 48 लोकसभा खासदार आहेत. तसेच राज्यसभेत 19 खासदार आहेत. म्हणजेच दोन्ही सभागृहांच्या खासदारांची संख्या 67 आहे. परंतु जनगणनेनंतर खासदारांची संख्या वाढणार आहे.

केंद्र सरकारच्या एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, देशात जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभा खासदारांची संख्या 76 बनणार आहे तर राज्यसभा खासदारांची संख्या 31 एवढी बनणार आहे. अर्थातच लोकसभा आणि राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे 107 खासदार राहणार आहेत.

वास्तविक 2001 मध्ये एक घटना दुरुस्ती झाली आणि या घटना दुरुस्तीनुसार देशातील संसदेतील सदस्यांची संख्या अर्थातच लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या निश्चित करण्यात आली. 2001 पासून पुढील 25 वर्षांपर्यंत ही संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. यामुळे 2026 पर्यंत खासदारांच्या संख्येत कोणताच बदल होणार नाही. परंतु 2026 नंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खासदारांची संख्या वाढणार आहे.

विशेष म्हणजे जनगणना देखील 2026 नंतरच होणार आहे. 2026 किंवा 2031 मध्ये जनगणना होईल आणि जनगणनेनंतरच खासदारांची संख्या वाढेल असे मत आता व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे यासंबंधीचा प्रस्ताव देखील संसद सदस्यांना देण्यात आला आहे. तसेच नवीन संसद भवनात सुमारे 1200 हून अधिक खासदारांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला मिळणार दोन खासदार

राज्यात सध्या 48 लोकसभा खासदार आहेत. पण ही संख्या वाढून 76 पर्यंत जाणार आहे. यामुळे राज्यातील 36 जिल्ह्यांना प्रत्येकी दोन खासदार मिळणार आहेत.

असं सांगितलं जात आहे की 15 लाख लोकसंख्या मागे एक खासदार राहणार आहे. अर्थातच 15 लाख लोकसंख्या असलेला एक लोकसभा मतदारसंघ बनवला जाणार आहे. यामुळे काही जिल्ह्यांना तीन खासदार देखील राहू शकतात असा अंदाज बांधला जात आहे. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts