Maharashtra News : शेती व्यवसायात पाणी हा एक अविभाज्य घटक आहे. पाणी शिवाय शेती ही होऊच शकत नाही. काळाच्या ओघात खरं पाहता अशी काही तंत्रज्ञाने शेतीमध्ये आली आहेत ज्याच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने माती विना शेती हे तंत्रज्ञान खूपच चर्चेचा विषय आहे. एरोपोनिक्स आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य झाले आहे. परंतु पाण्याविना शेती वर्तमानात पण अशक्य आणि भविष्यात देखील अशक्यच राहणार आहे.
शेतीसोबतच उद्योग व्यवसायाला देखील पाण्याची गरज असते. खरं पाहता सजीव सृष्टीला पाण्याविना जीवन जगता येणे अशक्य आहे. शेतीसाठी शेतकरी बांधव प्रामुख्याने विहिरीच्या तसेच बोरवेलच्या माध्यमातून पाण्याची सोय करत असतात. तसेच उद्योगासाठी देखील बोअरवेल करून पाण्याची सोय केली जाते. मात्र अनेकदा पाण्याचे हे बोअरवेल काही कारणास्तव बंद होतात. यामुळे शेतकऱ्यांच्या पुढ्यात नवीन संकट उभे राहत उद्योगाला देखील. बोअरवेल बंद पडले की पाणी व्यवस्थित मिळत नाही यामुळे उद्योग देखील संकटात येतो.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो ‘या’ तारखेला धावणार, मुहूर्त ठरला
मात्र, सोलापूरच्या विशाल बगले यांनी असं काही विशाल संशोधन केल आहे की, या बंद पडलेल्या बोअर मध्ये केमिकल टाकल्याने बोअर पुन्हा सुरू होतो. दरम्यान विशालच्या या संशोधनाची भुरळ गडकरींना देखील पडली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी विशालच्या या संशोधनाचे तोंड भरून कौतुक केले असून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप यावेळी मारली आहे.
विशाल यांनी त्याने केलेल्या या संशोधनाची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली आहे. गडकरी यांनी विशाल यांना वेळ देऊन त्यांनी केलेले संशोधन समजून घेतल आहे विशाल यांनी देखील याबाबत गडकरी यांना सविस्तर अशी माहिती दिली आहे. तंत्रज्ञान समजून घेतल्यानंतर गडकरी यांनी विशालचे कौतुक केले असून व्यवसायाने खनिज अभियंता असलेल्या विशालच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याच्या पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
वास्तविक, शेतीसाठी बोरवेल अति महत्त्वाचा घटक आहे. मात्र अनेकदा बोअरवेलला कमी पाणी लागतं किंवा बोअरवेल काही कारणास्तव बंद पडतात. अनेकदा तर बोअरवेल करूनही बोअरवेल कोरडे जात असल्याने शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाया जातो. अशा परिस्थितीत यावर उपाय म्हणून विशाल यांनी हे संशोधन केला आहे. विशालने कोरडे बोरवेल आणि चालू बोरवेलचे पाणी वाढवण्यासाठी सोपे व स्वस्त खर्चिक केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
गडकरी यांनी विशाल यांचे हे तंत्रज्ञान समजून घेत याबाबत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य सरकार यांना पत्र लिहून प्रकल्प राबविण्यासाठी सुचविले आहे. निश्चितच विशाल यांचीही कामगिरी कौतुकास्पद असून यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा तसेच देशभरातील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
याबाबत विशाल यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बोरवेल मध्ये किंवा कमी पाणी असलेल्या बोरवेल मध्ये विशाल यांनी तयार केलेले केमिकल टाकले जाते. हे केमिकलं प्रामुख्याने बोअरमधील झरे मोकळे करण्याचे काम करते यामुळे पाणी बोअरपर्यंत येऊन थांबते. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांसमवेतच सर्वच घटकातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊ शकणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार काम, पहा किती काम आहे बाकी?