Maharashtra Picnic Spot : भारतीय हवामान खात्याने 31 मे 2024 रोजी मान्सूनचे केरळात आगमन होणार असे म्हटले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तळकोकणात मान्सूनचे सात जूनच्या सुमारास आगमन होण्याची शक्यता आहे. यानंतर मान्सून 11 जूनला राजधानी मुंबईत येणार आहे. म्हणजेच आता लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे.
दरम्यान पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पर्यटन स्थळांवर वर्दळ वाढणार आहे. अनेक जण पावसाळ्यात पिकनिकला जाण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही यंदाच्या पावसाळ्यात कुठे फिरायला जाणार असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे.
आज आपण 2024 च्या पावसाळ्यात एक्सप्लोर करता येतील अशा तीन पर्यटन स्थळांची माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
गणपतीपुळे : पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी कोकणाचा पर्याय सर्वात बेस्ट राहणार आहे. मुंबई, पुण्यातील जनता दरवर्षी पावसाळ्यात कोकणात फिरायला येत असतील. जर तुम्हीही यंदा मान्सून काळात पिकनिकसाठी बाहेर पडणार असाल तर कोकणातील गणपतीपुळेला भेट देऊ शकता.
इथे तुम्हाला गणपती बाप्पाचे सुंदर असे मंदिर पाहता येणार आहे. बाप्पांचे दर्शन घेऊन तुम्हाला येथे निसर्गाचा मनमुराद असा आनंद लुटता येणार आहे. येथून कोकणाची सुंदरता उघड्या डोळ्याने पाहिली तर इथून तुम्ही माघारी परतण्याचे नावच घेणार नाहीत.
गणपतीपुळे हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात आहे. हे ठिकाण रत्नागिरी शहरापासून अवघ्या 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावत असतात.
तारकर्ली : मालवण पासून अगदी हाकेच्या अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे. येथे तुम्हाला अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा पाहायला मिळणार आहे. यामुळे जर यंदाच्या पावसाळ्यात तुम्हाला कुठं फिरायला जायचे असेल तर तारकर्लीला नक्कीचं भेट द्या.
हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पासून अवघ्या सात किलोमीटरच्या अंतरावर आहे. दक्षिण कोकणातील हे सर्वात सुंदर ठिकाण आहे. दक्षिण कोकणात जर तुम्ही कधी गेलात तर येथे नक्कीच भेट द्या.
सिंधुदुर्ग किल्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा किल्ला पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे दररोज पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. कोणताही ऋतू असो येथे देश-विदेशातील पर्यटक येतात. संपूर्ण देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेटी देतात.
ही एक ऐतिहासिक वास्तू तर आहेच शिवाय येथून तुम्हाला कोकणातील मनमोहक दृश्य देखील पाहायला मिळतात. या किल्ल्याला लागूनच तुम्हाला समुद्र पाहायला मिळतो. या किल्ल्यावरून सूर्यास्ताचा नजारा पाहणे ही गोष्ट मनाला खूपच आल्हाददायक अनुभव देणारी आहे.