Maharashtra Railway News : विठुरायाच्या नगरीत अर्थातच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे सालाबादाप्रमाणे याहीवर्षी कार्तिकी एकादशीला यात्रा भरणार आहे. यंदा 12 नोव्हेंबर 2024 ला कार्तिकी एकादशी असून या दिवशी पंढरपूर येथे यात्रा भरणार आहे आणि या यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहील.
या दिवशी हजारोंच्या संख्येने विठ्ठल भक्त, वारकरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे एकवटणार आहेत. खरेतर कार्तिकी यात्रेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत असतात. यंदाही हजारो भाविक येथे गर्दी करतील. यामुळे भाविकांच्या सोयीसाठी शासनाने प्रशासन दक्ष झाले आहे.
दरम्यान याच भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांकरिता मध्य रेल्वेने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय यावेळी घेतलेला आहे.
या निर्णयामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि जलद होईल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासन कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बिदर-पंढरपूर, आदिलाबाद-पंढरपूर-नांदेड दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवणार आहे.
या रेल्वे गाड्यांमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष दोन्ही एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक कसे राहणार या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बिदर-पंढरपूर दरम्यानच्या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार?
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बिदर-पंढरपूर ही विशेष गाडी बिदर येथून 11 नोव्हेंबरला रात्री सव्वादहा वाजता सोडली जाणार आहे आणि पंढरपूर येथे दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजून 20 मिनिटांनी पोहोचणार आहे.
तसेच, 12 नोव्हेंबरला पंढरपूर येथून रात्री आठ वाजता सोडली जाणार आहे आणि बिदर येथे दुसर्या दिवशी पहाटे साडेचार वाजता पोहोचणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही विशेष गाडी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या मार्गांवरील भालकी, कमलनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाउन आणि कुर्डुवाडी या स्थानकावर ही विशेष गाडी थांबणार अशी माहिती हाती आली आहे.
आदिलाबाद-पंढरपूर-नांदेड विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक?
ही कार्तिकी एकादशी विशेष गाडी आदिलाबाद येथून 11 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता सुटेल अन पंढरपूर येथे दुसर्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पोहोचेल. तर 12 नोव्हेंबरला पंढरपूर येथून सकाळी सव्वाआठ वाजता सुटून त्याचदिवशी रात्री आठ वाजून 40 मिनिटांनी नांदेडला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी नांदेड येथून 14 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजून 20 मिनिटांनी सुटणार आहे आणि पंढरपूर येथे दुसर्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पोहोचणार आहे.
तर 15 नोव्हेंबरला पंढरपूर येथून रात्री आठ वाजता निघून आदीलाबाद येथे दुसर्या दिवशी दुपारी बारा वाजता पोहोचेल. ही गाडी देखील या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबणार आहे.