Maharashtra Railway News : पुढल्या वर्षी देशात लोकसभा निवडणुका आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. म्हणून आता शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर संपूर्ण भारतीय बनावटीची आणि मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण देशात 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. अशातच महाराष्ट्राला देखील काही वंदे भारत एक्सप्रेस ची सुरुवात मिळणार आहे. यात नागपूर ते हैदराबाद दरम्यान देखील ही हायस्पीड ट्रेन सुरू केली जाणार आहे.
हे पण वाचा :- ग्रॅच्युइटीची रक्कम कशी ठरवली जाते, कोणता फॉर्मुला वापरला जातो, तुम्हाला किती ग्रॅच्युइटी मिळू शकते? पहा….
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर तसेच विदर्भातील नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर ते हैदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती.
आता सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दाखवला असून या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू झाली आहे. सध्या नागपूर ते हैदराबाद दरम्यान 25 एक्सप्रेस ट्रेन सुरू आहेत मात्र यामध्ये शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस सारख्या जलद गाड्यां खूपच कमी आहेत.
यामुळे या मार्गावर नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया समवेतच संपूर्ण विदर्भातील प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी आहे. आता या मागणीवर गांभीर्याने लक्ष घातले गेले असून लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे चित्र तयार होत आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! दहावी, बारावी बोर्डाचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; महाराष्ट्र राज्य बोर्ड करणार तारखेची घोषणा
किती वेळात होणार प्रवास?
सध्या स्थितीला नागपूर ते हैदराबाद दरम्यान ज्या एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत त्या गाड्यांना या दोन शहरा दरम्यानचा प्रवास करण्यासाठी जवळपास दहा तासांचा कालावधी लागतो. पण वंदे भारतमुळे हा प्रवास साडेसहा तासात पूर्ण होणार आहे. साहजिकच या ट्रेनने प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होण्याची शक्यता आहे. या ट्रेनमुळे विदर्भातील पर्यटनाला तसेच व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.
या ट्रेनला कुठं राहणार थांबा
नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ला कुठे थांबा राहणार ही ट्रेन केव्हा सुरू होणार आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाही. पण या मार्गांवरील बल्लारशा, सिरपूर कागजनगर, रामगुंडम आणि काझीपेठ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही ट्रेन थांबू शकते असा दावा केला जात आहे.
कसं राहणार वेळापत्रक?
ही प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सकाळी 6 वाजता नागपुर येथून रवाना होईल आणि दुपारी साडेबारा वाजता हैदराबादला पोहचेल. तसेच ही गाडी दुपारी दीड वाजता हैदराबाद येथून रवाना होईल आणि रात्री 8 वाजता नागपुरला पोहचेल अशी माहिती काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ शाळांचे वेळापत्रक बदलणार, 2 सत्रात भरणार शाळा; मंत्री गावित यांची माहिती