महाराष्ट्रात पुन्हा पाऊस हजेरी लावणार ! येत्या 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी, वाचा सविस्तर

राज्यात येत्या 48 तासानंतर पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. अर्थातच भारतीय हवामान खात्याने 3 डिसेंबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दिवशी राज्यातील दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. खरंतर बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे फेंगल चक्रीवादळ तयार झाले असून आता याच चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.

खरंतर भारतीय हवामान खात्याने आधी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर कोणताच परिणाम होणार नाही, असे म्हटले होते. पण आता याचा प्रभाव महाराष्ट्रावर पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान विभागाने नुकताच वर्तविला आहे.

या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र विभागातील आणि मराठवाडातील जिल्ह्यांवर पाहायला मिळू शकतो असा अंदाज आयएमडीने जारी केला आहे. आयएमडी मधील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या 24 तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे येत्या 6 डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडणार या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

या भागात पडणार पाऊस : भारतीय हवामान विभाग

राज्यात येत्या 48 तासानंतर पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. अर्थातच भारतीय हवामान खात्याने 3 डिसेंबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दिवशी राज्यातील दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे.

जिल्हा निहाय बोलायचं झालं तर या दिवशी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय दक्षिण भारतात वादळी वारे, गारा आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील बहुतांश भागात उद्या ढगाळ हवामान तयार होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. फक्त भारतीय हवामान खात्यानेच नाही तर पंजाबराव डख यांनी देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. दोन डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान राज्यात किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार, मात्र 4 डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यातील पावसाची व्याप्ती वाढेल असे पंजाबरावांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe