स्पेशल

सावधान ! अवकाळीचे संकट अजून गेलेले नाही; आज ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा ईशारा

Maharashtra Rain : येत्या काही दिवसात देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी याची पूर्वतयारी देखील सुरू केली आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अवकाळी पावसाने आणि काही भागात झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ऐन उन्हाळ्यात कोसळणारा हा पाऊस सध्या पिकांचे नुकसान तर करतच आहे शिवाय यामुळे येणारा मान्सून प्रभावित होईल की काय अशी भीती देखील शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.

विशेष बाब म्हणजे काही हवामान तज्ञांनी जर मे महिन्यात सलग पाऊस सुरू राहिला तर मान्सून वर विपरीत परिणाम होईल आणि मान्सून काळात कमी पर्जन्यमान राहील असा अंदाज आधीच व्यक्त केला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चिंतेची बाब समोर येत आहे.

भारतीय हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या मते आज दोन मे रोजी राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता या संबंधित विभागाला भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही विभागात पुढील तीन दिवस म्हणजेच पाच मे 2023 पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

एकंदरीत पावसाची शक्यता लक्षात घेता संबंधीत विभागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची तसेच पशुधनाची काळजी घेणे अपेक्षित आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने पावसाचे वातावरण तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली थांबू नये तसेच झाडाखाली जनावरांना बांधू नये अशा काही सूचना जाणकार लोकांनी दिल्या आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts