Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर असणारा परतीचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
त्यामुळे आज बुधवारपासून पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मान्सूनचा परतीचा प्रवास गेल्या महिन्यात सुरू झाला आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात पाच ऑक्टोबर पासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
मात्र परतीचा पाऊस नंदुरबार मध्येच अडकला आहे. पण आता पुन्हा एकदा परतीचा पाऊस सक्रिय झाला असून लवकरच नंदुरबार जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरेल असे दिसत आहे. यामुळे आता महाराष्ट्रात सर्व दूर परतीच्या पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
आज अर्थातच नऊ ऑक्टोबर आणि उद्या दहा ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज नऊ ऑक्टोबरला पूर्व आणि पश्चिम विदर्भातील ११ जिल्ह्यात म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १० जिल्ह्यात म्हणजे राज्यातील जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दुसरीकडे, मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाडा क्षेत्रात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या अर्थातच 10 ऑक्टोबरला म्हणजेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी देखील राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या पावसाची शक्यता लक्षात घेऊनच आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे.