महाराष्ट्रात उद्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता

हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होईल असाही अंदाज यावेळी जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आता व्यक्त होत आहे. खरीप हंगामा प्रमाणेच रब्बी हंगाम देखील हातचा जाईल अशी परिस्थिती तयार होताना दिसत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Published on -

Maharashtra Rain : खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आणि आता रब्बी हंगामातही निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोयं. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून उद्यापासून राज्यात अवकाळीचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट होईल असाही अंदाज यावेळी जाहीर केला आहे.

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आता व्यक्त होत आहे. खरीप हंगामा प्रमाणेच रब्बी हंगाम देखील हातचा जाईल अशी परिस्थिती तयार होताना दिसत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो

हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्यापासून अवकाळी पावसाचे सत्र सुरू होणार आहे. राज्यात 27 आणि 28 तारखेला अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज देण्यात आला आहे.

आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह, दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये उद्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे.

यातील काही भागांमध्ये गारपीट देखील होऊ शकते. 28 तारखेला मात्र राज्यातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्‍यता देण्यात आली असून याच जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये गारपीट होऊ शकते.

पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांमधील कमाल आणि किमान तापमानात घट होणार आणि थंडीचे प्रमाण कमी होईल असे म्हटले जात आहे.

ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाच्या परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील व भरभरा समवेतच इतर सर्व पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. द्राक्ष डाळिंब सारख्या फळबागांना देखील या पावसाचा फटका बसणार आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. दरम्यान भारतीय हवामान खात्याचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!