स्पेशल

Maharashtra Rain: डांगी पाऊस म्हणजे काय? महाराष्ट्राच्या ‘या’ भागात वाढणार डांगी पावसाचा जोर, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Maharashtra Rain:- सध्या राज्यातील काही भागांमध्ये चांगल्यापैकी पाऊस बरसत असून काही भागांमध्ये मात्र पावसाने अपेक्षेपेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये हजेरी लावल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या तर काही जिल्ह्यांमध्ये खरीपाच्या पेरण्यांकरिता अजून देखील दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण येणाऱ्या काही दिवसातील राज्यातील पावसाचा अंदाज पाहिला तर राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये 30 जून पर्यंत वर्तवलेला जो काही मध्यम पावसाचा अंदाज आहे तो कायम आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे.

 महाराष्ट्रातील या भागात वाढणार डांगी पावसाचा जोर

राज्यातील नंदुरबार, धुळे तसेच जळगाव अशा तीन जिल्ह्यात तर उत्तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण मालेगाव, सटाणा तसेच कळवण,सुरगाणा आणि देवळा यासारख्या तालुक्याचा विचार केला तर त्या ठिकाणी आठवडाभर म्हणजे चार जुलै पर्यंत डांगी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

डांगी पाऊस म्हणजे गुजरात राज्याच्या पश्चिमेकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजेच डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या पावसाला डांगी पाऊस असे म्हटले जाते व या पावसाची जोरदार शक्यता मात्र सध्या असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक, सिन्नर त्या सोबतच नांदगाव, निफाड आणि येवला या पाच तालुक्यांमध्ये 30 जून पर्यंत मात्र वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम आहे

व नगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील हीच परिस्थिती 30 जून पर्यंत असणार आहे. यासोबतच मुंबई आणि कोकण व विदर्भात देखील 30 जून पर्यंत वर्तवलेली जोरदार पावसाची शक्यता कायम असणार आहे. परंतु मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता येणाऱ्या पाच दिवसांसाठी वर्तवण्यात आलेली आहे.

 जून महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कसा असेल पाऊस?

कालपासून ते 27 आणि 28 जून पर्यंत महाराष्ट्र मध्ये हवामान खात्याच्या माध्यमातून ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच निवृत्त हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर वर्तवलेला  अंदाज पाहिला तर त्यांच्यामते किनारपट्टी भागामध्ये निवडक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Ajay Patil